आग्रह

Started by कदम, May 21, 2021, 02:31:00 AM

Previous topic - Next topic

कदम

कविता ÷ आग्रह तुझाच होता
----------------------------------------

मी तुझ्यावर प्रेम करावं
आग्रह तुझाच होता

मी तुझा हात धरावं
निग्रह तुझाच होता

स्वप्नांनांचा आकांक्षांचा हृदयी भावनांचा
संग्रह तुझाच होता

त्यांना पंख लावून उडायचा
दृढ संकल्प तुझाच होता

त्याला बळ सर्वांचे मिळावे
तो द्रोह पण तुझाच होता

माझा जीव अडकून तुझ्यात होता
विश्वास त्याला निंसंदेह तुझाच होता

तुझी मर्जी मर्जीचा डोह होता
माझी तारंबळ उडवणारा गिरोह तुझाच होता

तुझ्या प्रेमाची उपेक्षा करणं द्रोह होता
तुझ्यासाठी गेला शह जीव माझाच होता

माझ्या साथीचा तुला दाह होता
तुझ्यासवे केलेला तह माझाच होता

------------------------------------

-कदम.के.एल.