मैञी गजबलेले गाव असते

Started by कदम, May 21, 2021, 04:03:45 AM

Previous topic - Next topic

कदम

कविता - मैञी
---------------------------------------
मैञी एक गजबलेले गाव असते
एकच स्थानक हजार प्रवासी ज्याचे हृदय असे नाव असते
हृदयाची हृदयाला ठाव असते
प्रेमावरती तरंगणारी नाव असते
कधी आव कधी बाव असते
मैञी गजबजलेले गाव असते

मैञीची कठिणतेत धाव असते
दुःख कष्ट एकटेपणावर घाव असते
मैञीत;मिञत्वाची विश्वासाची हाव असते
आपलकी जिव्हाळ्यास देणारी भाव असते
चुकीवर ताव चांगुलकीवर वाव असते
एकी नेकी गावकीचा शिरकाव असते
मैञी गजबलेले गाव असते ...
------------------------------------- 
-कदम.के.एल.
(मो.नं.8788909563)