"तू माझी वन राणी "

Started by Atul Kaviraje, May 21, 2021, 11:50:38 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

 हळुवार  प्रेम   कविता  = प्रेमी  प्रेमिकेस  म्हणतोय ,  तुझे  रूप  पाहून  मला  तू       प्रत्यक्ष  या  बागेतील  वन -देवताच  भासू  लागली  आहेस , तर  या  फुलांचे  काय  विचारता  ? तर  ऐकुया  कविता  =  कवितेचे  शीर्षक  आहे = "तू  माझी  वन राणी "


                 "तू  माझी  वन राणी "
                 -------------------



सखे, अशी काय मोहिनी घातलीस
हि फुलेही वळून तुजकडे पाहू लागली
आमच्या सौंदर्यात कुणी घातलीय बाधा
म्हणून, ती अशी हिरमुसली झाली.


असे काय आहे रुपात तुझ्या
ती एकमेकाशी कुजबुजू लागली
ही मोहिनी, स्वर्गीय अप्सराच जणू
म्हणत  सारी बाग तुजभोवती घुमू लागली.


लाजून चूर झालेले तव रूप न्याहाळू लागली
गौर कांती तुझी हलकेच कुरवाळू लागली
आज तुझ्या रूप-दर्शनाने ही फुलेही  लाजली
म्हणाली, आज आम्हा तुझ्या रूपे वन देवी मिळाली.


-----श्री अतुल एस परब
-----शुक्रवार-21.05.2021