कविता-झोप

Started by कदम, May 22, 2021, 01:55:15 AM

Previous topic - Next topic

कदम

कविता ÷ झोप
झोप माणसाच्याच काय जनावरांच्याही
जीवनशैलीची खुप सुखद आणि आरोग्यदायी क्रिया आहे
झोपेमुळे प्राणीही फार प्रफुल्लित जीवन जगतात
मांजरं पाळून बघा कसे फिरून फिरून दमून भागून डारडूर झोपतात
माणसं तशी का झोपत नाहीत काहींची अनुत्तरीत सवय असू शकते तर काहींची झोप उडालेली असते त्यामुळे ते झोपत नसतात
माणसे मोठी मोठी आव्हाने देतात
काही माणसे स्विकारतात पण झोप उडते ती आव्हान घेणार्यांचीच
जे पोटासाठी किंवा कुटूंबासाठी जगत असतात ते दिवस घालवून दमून भागून डारडूर झोपू शकत नसतात
झोपेमुळे आकलन आणि संकलन क्षमता वाढतात
खोटी झोप मोठी खोटी करते नैसर्गिक झोप फारच नशीबाने मिळते
ती झोप पण माणसाची झोप उडवू शकते
पोटभर जेवल्यानंतर झाडांच्या कुशीत थंड वार्यामध्ये
जी जाड झोप येते त्या झोपेसारखी झोप रोज का येत येत नाही ?
माणसांना सुखाची झोप आली तर ते आनंदी आनंदी कोणतेही
कार्य पार पाडू शकतात
उपाशी पोटी कामच काय झोप पण नीट घेत नसतात
या कलियुगी रितीरिवाजामध्ये कष्टाचे वगैरे असे काही विचार सुद्धा लोक करत नाहीत पैश्याने शाॅर्टकट जाण्याच्या नादात माणसे बरीच आव्हाने एकञ स्वीकारून स्वतःची झोप आरोग्य बिघडवून घेतात
काही जण आपली झोप उडू नये म्हणून इतरांच्या झोपीची परवा करत नसतात
झोप आणि आरोग्य संभाळल्यानंतरच माणसे इतर गोष्टीत लक्ष घालू शकतात
जर इतरांना दडपणाखाली आणणारी आणि इतरांच्या दडपणाखाली राबणारी माणसे कधीही सुखाने झोप घेऊ शकत नसतात
--------------------------------------------
-कदम.के.एल.