चारोळ्या पावसाच्या - (भाग -१)

Started by Atul Kaviraje, May 22, 2021, 11:01:40 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                    चारोळ्या  पावसाच्या - (भाग -१)
                    ---------------------------

1) पाउस व बेडूक

बेडूक राव डराव डराव
काय मैत्री तुमची, मानले राव !
पावसाचे खरे दर्दी तुम्ही,
पाउस येण्यापाठी तुमचेच आहे नाव.

2) पाउस व छत्री

पाउस प्रियकर , छत्री प्रेयसी
कित्येक वर्षांचे नाते जुने
म्हणते,प्रेमाचे गुपित सांगणार नाही,
तो आल्याशिवाय मी उघडणार नाही

3) लगट पावसाची

पाउस उभा आडवा पडतो
पाउस अंगाशी लगट  करतो
म्हणतो, कितीही ढाल कर अंगाची ,
आज भिजविल्याशिवाय मी रहाणार नाही.

4) पावसात भिजणे

भिजण्याची मजा औरच असते
थेम्बा- तच   अशी जादू असते
शहारत, सुस्कारत, हुडहुडी देत .
अंगो -पांगी   रोम -रोम  फुलवते .

      5)  नाच पावसाचा

पाउस नाचताना कधी पाहिलाय ?
गिरक्या घेताना कधी पाहिलाय ?
पाउस असा पडता-पडताच,
फेर धरताना कधी पाहिलाय ?


-----श्री अतुल एस परब
-----दिनांक- शनिवार-22.05.2021.