या जन्मात भेटला पुन्हा भेटु नको

Started by कदम, May 23, 2021, 12:01:34 PM

Previous topic - Next topic

कदम

कविता - या जन्मात भेटला पुन्हा भेटु नको
------------------------------------------
या जन्मात भेटला
पुन्हा भेटु नको
अरे अरे कोरोना
तु व्हायरल होऊ नको

चीनची पाडली भिंत
आणि इंडिया गाठला थेट
कसा भेटलास अवकाळी
आता वरी ईवूनच भेट

जगाले लावले येड तु
तुले लवकर मरण ईईल
तु आणि चीन तुझा
नरकामधी जाईल

मास्क काय सांगितले लावाले
सॅनिटायझर सांगितले चोळाले
दारूडाच होता काय तो संशोधक पण
ज्याले औषध पण दारूच मिळाले
------------------------------‌------------

- कदम.के.एल.