सकारात्मक व्हायचं😊

Started by vaibhavbonge, May 23, 2021, 01:24:33 PM

Previous topic - Next topic

vaibhavbonge

  सकारात्मकता

जग सर्व ठप्प आहे,

मित्र-मित्रांपासून दूर आहे,
माणसांचे माणूसपण दुरावलंय,
काहींनी आपलं जवळचं माणूस गमावलय,
म्हणूनच का आपण रडायचं,
असतील ही हो हालाखीचे दिवस,
मात्र आपण सकारात्मक राहायचं...!

शाळा, मंदिरे, उद्योग, शहरे, गावे,
अगदी, मुक्त स्वच्छंदपणे बागडणे,
सुद्धा जेरबंद  झालं आहे,
बसून घरात माणूस तुटलेला आहे,
म्हणूनच का आपलं मन,
नकारात्मकते कडे झुकवायचं...

नाही, नाही, कदापि नाही,
पहा त्या दवाखान्याकडे,
झोपेविना अविरत कामाकडे,
आई-बापाविना त्या घराकडे,

अहो, आपल्या जीवासाठी,
झटतात अहोरात्र ते,
नसतीलही मंदिरातील पण,
त्या माणसातील देवांसारखे....
म्हणूनच म्हणतो सांगा,

आपणच का नकारात्मक व्हायचं,
सकारात्मक वागायचं, सकारात्मक व्हायचं.

                  @वैभव भोसले(बोंगे)