कविता-जेवण

Started by कदम, May 23, 2021, 02:33:29 PM

Previous topic - Next topic

कदम

जेवण
----------------------------------------
जेवण हा असा विषय आहे
जे केल्यानंतरच बाकीचे विषय
चांगल्या पद्धतीने कळू शकतात
जेवण झालं नाही तर पोट रिकामे राहते
तसे काम पण अर्धवट राहते
अगोदरची माणसे पहिले जेवण
नंतर काम करत असत्
आजकाल काम नाही तर
जेवण नाही असं असतात करत
तर नेमका जेवणाची पंगत भरावायची
का कामाची पंगत भरवायची हा प्रत्येकाच्या
अकलनाच्या आवाक्यात नाही का बसत
पोषक आहार असला कि शरीर निरोगीरित्या कार्य करते
त्यात सातत्य ठेवणे एखाद्यालाच शक्य होते
सकाळ दुपार संध्याकाळ असे तीन वर्गीकरणात केले जाते
तर औद्योगिक वसाहतीत ब्रेकफास्ट ने सुरूवात
आणि लंच ब्रेक देवून
नंतर वामकुक्षी असे काही प्रकार
न ठेवता झपाट्याने खाल्लेले जिरवाचे असते
लग्नातील भोजन वास्तुशांतीचे भोजन
मंडाळाचा प्रसादाचे भोजन हे पण वार्षीक सांस्कृतिक परंपरा यामध्ये मोडते
नंतर प्रवासामध्ये उपहार गृहात केलेली पोष्टीक न्याहरी घ्यायचे असते
भुक हाच खरा पोटात शिरलेला रावण
त्यामुळे करत जा सर्वजण वेळेवर जेवण
----------------------------------------
-कदम.के.एल.