" माझा अबोल साजणा "

Started by Atul Kaviraje, May 23, 2021, 05:55:11 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                    " माझा अबोल साजणा "
                    ---------------------



का बर हा अबोला
का बर हा दुरावा
जवळ असूनही साजणा तू
का बरे असा तू दूर राहावा ?


मनातले तुझ्या आहे काय ?
निसंशय मजसी वद तू
असा हात बांधून नको राहूस
मजसी का धरिलास अबोला तू ?



तुझ्या एका  स्पर्शासि आतुर
प्रेमाचा शब्द येउदे मुखातून
आता  हाताची मिठी सोडवून
जाणवू दे मम तुझ्या  स्पर्शातून.


असा आश्चर्याने नको पाहूस
तुला खरच रे मी सांगतेय
आता हा अबोला सोड
तुझ्यावर  खरच मी खूप प्रेम करतेय !


-----श्री अतुल एस परब
-----दिनांक-23.05.2021-रविवार .