कविता -आयुष्य

Started by कदम, May 24, 2021, 09:53:41 AM

Previous topic - Next topic

कदम

आयुष्य हीच रंगीत तालीम आहे
आयुष्य घडवण्यासाठी आयुष्याच्या रानात
भावनांचे आणि श्रमाचे पिक घ्यावे लागते
आणि संस्कृती परंपरा यांचा फायदा काढायचे असते
काही वाट चुकलेले पैसा जमिन जुमला बंगला
यांच्या मागे धावणारे असतात तर काही जण त्यांना धावताना पाहून धावणारे असतात
आपण धावले पाहिजे निरोगी आयुष्यास
यशस्वी पणे जीवन घडवण्याकरिता
जीवनात जेंव्हा हात रिकामे राहतात
तेंव्हा कळते आपण आता पर्यंत आयुष्यामध्ये
किती खचता खाला,
आलेला व्याप आपल्याला आपल्या जीवनातील
आलेले प्रसंग
आपण कसे सामोरे गेलो याची ग्वाही देतात ...
येणारे प्रसंग व्यंग ढंग रंग तंग
हेच खरे आत्मनिर्भर बनवण्यासाठी देतात संग
कष्ट त्यांना वाटतात जे याच्या लायक बनत नाहीत
आणि जे लायक बनतात त्यांच्यासाठी काहीच
वावगे राहत नाही आणि त्याचेच कर्तुत्व करते जीवन दंग
आयुष्य जगता जगता जगण्याची रंगीत तालीम देत असते
त्या तालमीत कोणी एक खेळाडु नसतो
कोणी एक रेफरी नसतो
कोणी प्रेषक नसतो
कोणी तारक कोणी पुरक कोणात कोणता फरक नसतो
माणुस असीच तालीम पुर्ण आयुष्यभर घेत असतो
यातच क्षणिक विश्रांतीला आयुष्य असे नाव असावे !
-कदम.के.एल.