कस सांगु मी तुला........

Started by rakesh kamble rk, May 24, 2021, 09:18:45 PM

Previous topic - Next topic

rakesh kamble rk

कस सांगु मी तुला........

सांगु कस तुला मी साजणी
मन माझे तुझ्यामध्ये गुंतले

तुझ्या एका भेटीने मन माझे फुलले
आयुष्याच्या इंद्रधनुष्याचे रंग बदलले

गर्द रानाच्या काटेरी कुंपणातील फुल मज आवडले
भिती भीतीने मन माझे हरवले

प्रत्येक  शण रंगवूनी मी फुलवू लागलो
दुःखाचे ढग मन तुडवू लागलो

आज भिती नाही कुणाची मनाला
फक्त दिसते तिच माझ्या ऋद्याला

Rakesh Kamble Rk
8983100210

Atul Kaviraje

      राकेश सर, "कसं सांगू मी तुला", या कवितेतून आपण, आपली सजणी आपल्या आयुष्यात आल्यानंतरचे ह्र्द्य अनुभव अतिशय उत्कटतेने सांगितले आहेत. प्रेमिका माझ्या जीवनात आल्यावर जीवन कसे बदलून गेले, आवडू लागले, जीवनात काही अर्थ आला, हे मनीचे भाव आपण सुंदर रित्या उदाहरणासह लिहिले आहेत.

     अश्याच सुंदर, मनास भावणाऱ्या, जीवनास अर्थ आणणाऱ्या कविता, आपल्या लेखणीतून प्रसवो, हि सदिच्छा करतो, आणी आपल्या कवितेच्या यापुढील प्रवासास शुभेच्छा देतो.

     प्रेम-बाग फुलवलीस तू येऊन जीवनात
     झरा दाखवलास तू मम् वाळवंटात
     जगण्यास खरा अर्थ देत
     अशीच राहा तू मम् हृदयात.

----- श्री अतुल एस परब
-----दिनांक-२८.०५.२०२१-शुक्रवार.