इच्छेचे ओझे

Started by कदम, May 25, 2021, 11:30:39 AM

Previous topic - Next topic

कदम

÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
कवितेचे नाव - ढेर रे ढेर
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
जेंव्हा समस्यांचा घेर घेतो
मानवाभोवती फेर
जीवनाचा होतो बरका केर रे केर
कान लावून ऐकत असतो जेंव्हा हेर
वाढत जाते बरका बैर रे बैर
कलियुग आहे म्हणे स्वैर रे स्वैर
उगाच का तु घेतो वैर रे वैर
वाटत नाही ? वैर ते गैर रे गैर
वैर घेवून मानवाची नसते खैर रे खैर
हुज्जत भांडणांची नुस्ती फैर रे फैर
माणुस बिघडला इच्छेंनीच
इच्छेंच्या ओझ्याखाली ढेर रे ढेर
____________________________
-कदम.के.एल.