"ऐक जिवलगा माझी साद"

Started by Atul Kaviraje, May 25, 2021, 11:02:58 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                   "ऐक जिवलगा माझी साद"
                   ----------------------

      एक  लघु प्रेम  कविता.  प्रेमिकेची जिवलगास  प्रेमाची  साथ, तिचे  त्याच्यावर   इतके  प्रेम  आहे , कि  सोबत  कुठेही  राहायची  तिची  तयारी  आहे.  तर  ऐकुया  तिची  त्याला  कवितेतून  साद  कवितेचे  शीर्षक  आहे   "ऐक  जिवलगा  माझी  साद "   

अशीच राहू दे सदैव तुझी  साथ
साजणा दिवस असो वा रात
या छत्रीखाली संसार आपला
असेच बांधूया घर आपले उन्हात.

जिथे तू आणि मी फक्त  राहू
संसाराची सुखी  स्वप्ने  मग आपण  पाहू
उन्हाळा ,हिवाळा वा असो  पावसाळा
एकत्र  राहण्याची  शपथ  पुन्हा  वाहू. 

मिळेल मग आपणा दोघांस एकांत
कर साजणा मजवरी प्रेमाची बरसात
दोन जीव एक हृदयाचे आपण दोघे
न्हाऊ दे तुझ्या प्रेमाच्या उबदार स्पर्शात.


-----श्री अतुल एस परब
-----दिनांक-25.05.2021-मंगळवार.