किती वेळा सांगायचं

Started by कदम, May 26, 2021, 05:47:02 AM

Previous topic - Next topic

कदम


किती वेळा सांगायचं तु म्हणजे नाद खुळा आहे
-------------------------------------------
किती वेळा सांगायचं
तु म्हणजे नाद खुळा आहे

तु अजून भोळा आहे
तुझं प्रेम आगीचा गोळा आहे
वय वय माझं सोळा आहे
भय भयाचा मला कवळा आहे
प्रलय प्रलय प्रलय तुझी शाळा आहे
गळ्यात माळ आणि नाॅनवेजचा तुला लळा आहे

किती वेळा सांगायचं
तु म्हणजे नाद खुळा आहे

तु अजून कोवळा आहे
माझ्यावर माझ्यावर टपलेला कावळा आहे
तु आंबट पाचट चिंच आहे
लोणच्यातला आवळा आहे
तु तु कपाळावरचा टिळा आहे
माझा गोड गोड गोड गळा आहे

किती वेळा सांगायचं
तु म्हणजे नाद खुळा आहे

माझं मागणं तुला तुला हजार वेळा आहे
आयुष्य आयुष्य आयुष्य हे एकवेळा आहे
तुझ्या तुझ्यावर तुझ्यावर तर माझा डोळा आहे
तु माझा श्वास सावली तुच तुच उन्हाच्या झळा आहे
तब्येतीने जरी खिळखिळा आहे
माझा आणि माझाच सगळा आहे

किती वेळा सांगायचं
तु म्हणजे नाद खुळा आहे
-------------------------------------------
-कदम.के.एल.