कुणी तरी असावी...

Started by harishnaitam, May 26, 2021, 11:28:38 AM

Previous topic - Next topic

harishnaitam

कुणी तरी असावी...

कुणी तरी असावी
आस्थेने विचारपूस करणारी
काय करतेस, कसा आहेस
काळजी घे म्हणनारी ||

कुणी तरी असावी
मनातल समजून घेणारी
बघताच क्षणी मनातल
सारं काही ओळखणारी ||

कुणी तरी असावी
दिसताच मिठी मारणारी
हळूवार केसांवरून हात
फिरवून आपलंसं करणारी ||

कुणी तरी असावी
जिवाला जीव लावणारी
प्रत्येक सुख - दुःखात
सोबत असणारी ||

कुणी तरी असावी
तु माझाच आहेस म्हणून
हातात हात घेऊन
प्रीतीची साथ देणारी ||

कवी : हरिष नैताम (२२ मे २०२१ सं. १०.००वा.)

Atul Kaviraje

     हरीश सर, आज दुपारीच मी आपल्या एका कवितेस  दाद दिली होती-कुणीतरी आवडलं होत. आणि एका कवितेस दाद देण्यास मला नक्कीच आवडेल ती म्हणजे-कुणी तरी असावी.

     आपल्याला मनापासून वाटत असत, कि कुणीतरी आपलंस असावं, कुणीतरी आपल्या प्रेमात असावं, आपली काळजी घेणारी, विचारपूस करणारी, सुख दुःखात भागीदार असणारी, जीव लावणारी, आस्था दाखविणारी.

     शेवटी आपण माणूसच आहोत, आपल्यालाही प्रेम करण्याचं, प्रेम देण्याचा हक्क आहे. त्यामुळे हे त्याचे विचार सहज आहेत. आपल्या कवितेतील नायकाचा मानस काही वेगळा नाही. तो या संबधी त्याला जे वाटत , ते कथित करतोय. अतिशय सुंदर अशी हि प्रीती कविता, मनास सुखावून गेली. प्रेमाचा ओलावा देऊन गेली.

     माझ्या खालील चारोळीतील माझी प्रेयसी ही आता माझी अर्धांगिनी आहे. पण त्यामुळे प्रेम स्वरूप बदलले नाही. ती माझ्यावर तेव्हढंच प्रेम करते , जेव्हढ  ती लग्ना-आधी करीत होती.

     
     तिचे प्रेम आपलंस करतं
     तिच्या श्वासांत ते जाणवतं
     थरथरते ओठ नाहीच बोलत
     निशब्द कृतीतून  मला कळतं

-----श्री अतुल एस परब
-----दिनांक-२६.०५.२०२१-बुधवार.