विनोदी वास्तव कविता - "माझी पाठ -कंबर दुखी"

Started by Atul Kaviraje, May 26, 2021, 05:04:25 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                           विनोदी वास्तव  कविता
                         "माझी  पाठ -कंबर  दुखी"
                         -----------------------

नोकरी  माझी  अशी  आहे
सतत  बैठे  काम  वाहे ,
तेव्हापासून  सहन  करतोय  दुःखे
माझी  पाठ -कंबर कायमची  दुखे .

हलायचे  नाही ,वळायचे  नाही
सतत  संगणकाकडे  पाहात  राही ,
कामाच्या  वाढत्या  प्रमाणा -बरोबर
दुखण्याचेही  प्रमाण  वाढत  राही .

इकडे  नाही , तिकडे  नाही
अलीकडे  नाही , पलीकडे  नाही ,
पाठीचे  कुठेच  वळणे  नाही
कंबरेचे  कुठेच  मुरडणे  नाही .

बेरीज ,वजाबाकी , गुणाकार ,भागाकार
अधिक ,उणे ,भागिले ,गुणे ,
संख्याची  करता  आकडे -मोड
कंबरेचीही  झालीय  मोड -तोड .

नोकरी  मिळाली ,पैसा मिळवला
सरकारी  नोकरीतून  निवृत्तीही  मिळाली
पण  कायमचेच  दुखणे  बळावलेय
पाठ -कंबरेने  आपली वृत्ती नाही सोडली .

सर्वांना  एकच  प्रेमळ -मोलाचा  सल्ला   
नोकरी  करावी  उठण्या -फिरण्याची
सर्वांगास सर्व व्यायामही मिळे
अवयव - ही राहातील  शाबूत  सगळे .


-----श्री अतुल एस परब
-----दिनांक-26.05.2021-बुधवार.