" स्वच्छंद फुलपाखरू "

Started by Atul Kaviraje, May 30, 2021, 12:49:37 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

      मनमुराद  उडणारे  सुंदर   फुल -पाखरू,  जास्त  काही  प्रस्तावना  देत  नाही , कविता  वाचताना  आपणास  माझी  सहज  भावना  नक्कीच  भावेल.   कवितेचं शीर्षक  आहे  " स्वच्छंद  फुलपाखरू "

                          " स्वच्छंद  फुलपाखरू "
                          --------------------

उडू दे तयास मुक्त
विहरू दे त्यास मन मुराद
सुंदर दिसते ते पहा उडताना
कसे दिसेल त्यांना पिंजऱ्यात ठेवताना ?


मुक्त जीवन हेच त्यांचे स्वातंत्र्य
त्यांना असे अडकवू नका
त्यांचे जीवन त्यांना जगू द्या
त्यांचे स्वातंत्र्य हिरावू नका.


अलगद हस्ताने त्यांना कुरवाळा
पंखांवर  हळुवार बोटे फिरवा
एक प्रेमाचा वारसा त्यांना देऊन
पुनः आपलेसे असे करा.


त्यांची  भीती त्याच क्षणी संपेल
त्यांना पुन्हा पुन्हा यावेसे वाटेल
एक प्रेमाचा भुकेला मूक जीव
तुमच्या भेटीस पुन्हा पुन्हा येईल.

-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-30.05.2021-रविवार.