भान

Started by yallappa.kokane, May 30, 2021, 03:56:54 PM

Previous topic - Next topic

yallappa.kokane

भान

प्रेम करायला कधीही
काळ वय लागत नाही
लोकं काय म्हणतील?
याचं भान राहत नाही

सुरुवात होते नजरेने
घडायचं ते घडून जातं
काही शब्द न बोलता
मन का जडून जातं?

श्वासांचा पाठलाग होतो
जवळ दोघे असल्यावर
मनातलं मनातच राहतं
नजरेस नजर भिडल्यावर


यल्लप्पा सटवाजी कोकणे
यल्लप्पा सटवाजी कोकणे
९८९२५६७२६४
बदलापूर

Atul Kaviraje

    यल्लप्पा  सर, प्रेमात असलेल्या प्रेमिकांची अवस्था काय असते, हे त्यांनीच जाणावे.  आमच्या सारख्यानी ते फक्त पाहात राहावे किंवा त्याची फक्त कल्पनाच करावी. " भान", या आपल्या सद्य कवितेतून प्रेमाच्या सुंदर भाषेचे आकलन होते, प्रेमाची अपिरिमित व्याख्या उमजून येते.

     ते प्रेमी प्रेमाच्या त्या उत्कट शिखरावर कधी पोहोचतात, इतके ते भान विसरून, एकमेकांकडे आकर्षित होतात. प्रेमाच्या त्या अखिल जगताचे ते राजा आणि राणी असतात. त्यांना, आता जगाचे, कळी-काळाचे कोणतेही भान नसते, असे ते बेभान होऊन प्रेमास अर्पण होतात.

     प्रेमाच्या वर्षावात तुझ्या साजणा
     वाटतेय, मी चिंब मनमुराद नहावे 
     अशीच जावोत वर्षानुवर्षे उलटून
     पाहात आपणास काळानेही थांबावे.

-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-३०.०५.२०२१-रविवार.