"जुळून आल्या रेशीम -गाठी "

Started by Atul Kaviraje, June 01, 2021, 01:13:43 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

     मराठीतील  उज्ज्वल  दूर -दर्शन -तारका  प्राजक्ता  माळी  यांची  एक   गाजलेली  मालिका  जुळून  येति  रेशीम -गाठी.  प्रस्तावनेचे  लांबण  न   लावता  प्रत्यक्ष
कविताच  ऐकुया. कवितेचे  शीर्षक  आहे  = "जुळून आल्या रेशीम -गाठी  "

                   "जुळून आल्या रेशीम -गाठी"
                   -------------------------

प्राजक्ता फुलासारखी फुलत रहा
मालिकेत अशी उमलत रहा
या रेशीम गाठी दृढ राखून
कुटुंबास एक बंधनात बांधीत रहा.


आपल्या मधुर हास्याच्या गोड
कळ्यांना शुभ्र गुंफीत रहा
आपल्या लाघवी शब्दांच्या उच्चाराने
सर्वाना आपलेसे करीत रहा.


आज यशाची पायरी गाठलीय या मालिकेने
तुझ्या अभिनयानेही कळस गाठलाय
पहाता पहाता जुळल्यात रेशीम गाठी
तुझ्या मेहनतीने रंग आणलाय.


अगदी टोकाचे गाठावे शिखर
तू तुझ्या या सुंदर अभिनयाने
अजूनही भक्कम होतील या रेशीम गाठी
अमुच्या सदिच्छा सदैव आहेत तुझ्या पाठी.

-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-01.06.2021-मंगळवार.