चारोळी -लेख - "देऊळ पावसाचे"

Started by Atul Kaviraje, June 02, 2021, 12:13:11 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                      चारोळी -लेख
                                    "देऊळ पावसाचे"
                                    ---------------

तूच माझे देऊळ, तूच माझे राउळ
तुझ माझा देव, तूच माझा भाव
भजितो तुला मंदिरी,
पूजितो तुला हृदयीही.



     मित्रानो तर हा माझा पाउस , आपला पाउस, येऊन पडून जातो, खूप काही देऊन जातो, अनंताकडून येतो, अनंताकडे जातो, त्या मेघांतून पाणी होऊन बरसतो, अमृत सिंचन करतो, जल होऊन बरसतो, आमच्या गरजा पूर्ण करतो, सर्व जग जल मय करतो, ज्याची आम्हाला जगण्यास प्रथम गरज आहे, असे जीवन , असे जल , असे पाणी तो आम्हाला देतो, आमची वर्ष भराची सोय तो तलावाच्या  रूपे करून जातो, तलाव, जल-प्रपात, ओढे, ओहोळ, भरपूर  पाण्याने नेहमीच भरलेले दृश्य ,कधीही लोभस वाणे वाटते, ते असेच भरून वहाणारे असोत, अशी हा  मानव नेहमीच प्रार्थना करीत असतो, आणी हा पाउस येऊन त्याची हि प्रार्थना नेहमीच पूर्ण करीत असतो.


तलाव भरले, तुडुंब भरले
पहा कसे उतू जाऊ लागले
हा ऋतू-राजाच असा आहे
सारे कसे जलमय होऊ लागले.


     तर मित्रानो, या पावसाने माझ्या, आपल्या सर्वांच्या मनात एक खास स्थान निर्माण केले आहे, एक असे स्थान कि त्याला ईश्वराचा दर्जा देण्याचे मन करीत आहे, हो आणि का नाही, ईश्वराला आपण कोणीही पहिले नाही, तरी पण तो आहे, अगदी जळी-स्थळी-काष्टी-पाषाणी, त्याचे अस्तित्त्व जाणवत आहे, तो सर्वांमध्ये आहे, भरलेला आहे, तो असल्यामुळे आम्ही खुश  आहोत, आनंदी आहोत, आणि या खुशीत भर टाकण्यासाठी, त्याने आपला एक देवदूत या पावसा रूपाने पृथ्वी तलावर पाठविला आहे, ज्याने येऊन , भरपूर काही देऊन आमच्या मनात ईश्वराचे, देवाचे एक स्थान प्राप्त केले आहे, मी तर त्याचे न जाणो भविष्यात  एक मंदिर, एक देऊळ, एक राउळ बांधायचे ठरविले आहे, त्यात त्या माझ्या प्राण-प्रिय मित्राची, देवाची अमूर्त अशी मूर्ती स्थापन करून त्याला भक्ती-भावाने भजण्याचे, पुजण्याचे ठरविले आहे,


माझा देव मला भेटला
माझा ईश मी पहिला
त्याचा भाव मी जाणिला
अंतराला तो स्पर्श करीता झाला.


     तर असा हा माझा देव, त्याची हि जपलेली मूर्ती मी आजही रोज माझ्या अंतरी भक्ती-भावे पूजितो , त्याचे निरंतर ध्यान करतो , त्याला श्रद्धा अर्पण करतो , त्याला रोज मनात पहातो , त्याचा ऋतू नसला तरी त्याला आठवून त्याच्या रूपाचे गुण-गान  करतो , भक्ती-गीत गातो , त्याने आमच्यावर एवढे उपकार केले आहेत, कि हि भक्तीही कमी पडेल, हि श्रद्धाही तोकडी होईल, असा हा माझा पाउस, माझा सखा, माझा देव याने नित्य यावे, त्याचे रूप दाखवावे, आम्हा संजीवनी द्यावी, जल-अमृत द्यावे, म्हणून मी त्याची सदैव प्रार्थना करतो , व त्याचे चरणी स-श्रध्द माथा टेकतो , शिश झुकवितो .


नित्य तुला पाहावे, नित्य तू यावास
तू अगदी असाच असाच रहावास
मागणे एक, एकच मनीची प्रार्थना
दर वर्षी तू असाच आम्हा दिसावास.

-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-02.06.2021-बुधवार.