कविता-पावसाची आरती

Started by कदम, June 02, 2021, 05:29:08 PM

Previous topic - Next topic

कदम


------------------------------
जय देव जय देव जय वरूण देवा
अधून मधून दर्शन चांगले देत जावा ॥

जुले च्या मासी तुम्ही प्रकटता
सप्टेंबर मध्ये तुम्ही लुप्त होता
लहान मोठ्या पाडतअसी धारा
धारेबरोबरोबर मोठमोठ्या गारा

जय देव जय देव जय वरूण देवा
अधून मधून दर्शन चांगले देत जावा ॥

झाडे सुद्धा करतील हो नवल
सप्तरंगी इंद्रधनुष्य दाखवेल नभ धवल
तुडूंब भरूनहो नदी वाहल
आश्चर्य व्यक्त पशुप्राणीही करल

जय देव जय देव जय वरूण देवा
अधून मधून दर्शन चांगले देत जावा ॥
--------------------------------------
-कदम.के.एल.