गझल

Started by adititambebhide, June 03, 2021, 01:32:43 PM

Previous topic - Next topic

adititambebhide

चन्द्र - तारे - सावल्यांनी
भारले आकाश सारे...
तो बिचारा सूर्य तेथे...
अजूनही जळतोच आहे!

मांडले त्यांनी पसारे
वाहिले बेधुंद वारे...
' तो ' बिचारा तळपताना...
एकटा झुरतोच आहे!

रात्रीचे आकाश म्हणते
ही धरा माझ्याच साठी!..
" मी ही येथे राहतो!!"
.. तो एकटा म्हणतोच आहे!

तप्त - शुष्क नी शून्यतेहून
सौम्यता भावे मनाला...
याचसाठी अंतरावर...
तिष्ठूनी तो थांबलाहे!

सूर्य तो आहे प्रभावी...
जाणतो पण बंधने ही!
त्यामुळे तो एकटाची...
' दाह ' हा सहतोच आहे!

तो बिचारा सूर्य तेथे...
अजूनही जळतोच आहे!!..

© आदिती भिडे.