चारोळी-कोरोना चार ओळी संग्रह!

Started by कदम, June 03, 2021, 10:08:03 PM

Previous topic - Next topic

कदम

------------------------------------
कोरोना चार ओळी संग्रह
------------------------------------
कोरोना म्हणाला माणसांना
कोरोना म्हणाला माणसांना
माणसांनो जास्त माजू नका
आणि चायनीय वस्तु वापरायला
अजिबात लाजु नका !
------------------------------------
कोरोना च्या लढ्यामध्ये
सज्ज झाले कोरोना योद्धे
कोरोना च्या लढ्यामध्ये
सज्ज झाले कोरोना योद्धे
ऑक्सीजन व् लसी अभावी
रखडले सर्वच मुद्दे !
------------------------------------
अगं बाई हा कोरोना
किती गं छळतो
विना तिकीट विना पासपोर्ट
जगभर गं 🥺 फिरतो!
------------------------------------
हा कोरोना जिवाणू कसला
अहो तो तर विषाणू आहे
त्याची लस घरोघरी पाठवा
आम्हाला तर लग्नाची घाई आहे
------------------------------------
-कदम.के.एल.
------------------------------------

Atul Kaviraje

 
     कदम सर, "कोरोना चार ओळी संग्रह", या चारोळी संग्रहातून आपण  कोरोनाचे आजचे वास्तविक, भयानक , विदारक चित्र समोर उभे केले आहे. विमानातून जगभर पसरलेला हा विषाणू, आज डोके वर करून उजळ माथ्याने सर्रास वावरत आहे. त्याला भय ना भीती, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

     आपण म्हटल्याप्रमाणे, या विषाणूला जर का वेळीच आळा घातला गेला नाही, तर अत्यंत दारुण परिस्थितीला आपल्या सर्वाना तोंड द्यावे लागेल. अतिशय समर्पक अश्या आपल्या कोरोना चारोळ्यांना आपण विनोदाची एक झालरही दिली आहे.

     असो, जोवर परिणामकारक लस यावर येत नाही, तोवर मनुष्य जातीचे बरेचसे मुद्दे रखडल्या प्रमाणेच आहेत. आपल्या हाती  फक्त, नेहमीच मास्क वापरणे, वेळोवेळी हाताला सॅनिटाइजर लावणे, व जास्तीत जास्त सोशल अंतर ठेवणे, हे मुद्दे यापुढेही अनेक वर्षे राहातील.

     मानव जात कालही तरली होती
     मानव जात आज अन उद्याही तरेल
     बस मानवा, तू होऊन नकोस हताश
     फक्त लढा दे, ठेवून स्वतःवर दृढ विश्वास.

-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-०३.०६.२०२१-गुरुवार.