विनोदी-विडंबन कविता - "बोकीलांचा अर्थपूर्ण खेळ"

Started by Atul Kaviraje, June 04, 2021, 01:32:51 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

     मित्रानो, कालच पोस्ट केलेली  माझी  "हजार-पाचशे, टाळ्या आणि हशे", ही विडंबनात्मक कविता आपण वाचली असेलच. तर मोदीजींच्या या निर्णयापाठी , हजार पाचशेच्या नोटा बंदीसाठी , तेव्हाचे त्यांचे अर्थ-तज्ज्ञ श्री बोकील यांचा फार मोठा हात असल्याचे ऐकिवात आहे. देशाचे भविष्य ओळखूनच त्यांनी ही सुसंबद्ध चाल खेळली असावी, असं जाणकार म्हणतात.

     असो, या विषयावरही एक चांगली अर्थ-पूर्ण कविता होऊ शकते , हे लक्षात येऊन मी या विषयावर एक विडंबन कम  विनोदी कविता रचली आहे. तिचे शीर्षक आहे -    "बोकीलांचा अर्थपूर्ण खेळ"

                        "बोकीलांचा अर्थपूर्ण खेळ"
                        ----------------------


काळ्यावरी पांढऱ्याने लिहिली
सत्ययुगाची नामावली
फळा आली खऱ्या अर्थी,
अर्थ-शिरोमणी बोकिलांची वकिली.

          मोदींचा जणू उजवा हात
          मानतात ते एकाचीच बात
          राजकारण येथे रुजते,
          खरे कारण मग कळते.

बोकीली पांडित्य पाहुनी
जनता तोंडी बोटे घाली
वाकपटू यांच्या वकिलीने,   
खोट्यांची बोलती बंद केली.

           आज देश सुखरूप आहे
           खऱ्या सत्ताधारांच्या हाती
           काळा-बाजारू कडे आलीय,
           कथिलाची वाटी अन माती.

हे चित्र यापूर्वीच
बदलावयास हवे होते
देर नाही पर दुरुस्त सही,
वेळे तुझे आजही महत्त्वे.

             असेच शंभर वकील
             जर देशा लाभले
             भारत महा-सत्ता होण्याचे,
             दिवस जवळी आले.

हजार पाचशेच्या नोटा
आज आनंदी झाल्यात
नवं रूप लेउनी,
त्यांच्या ज्योती उजळल्यात.

               आता यापुढे मनापासून
                एक शपथ घेऊया
                भ्रष्टाचाराची पाळेमुळे,
                समूळ उखडून टाकूया.

सर्व-सामान्याने यासाठी
एक होणे गरजेचे
एकीचे बळच ठेवील टिकवून,
उज्ज्वल भवितव्य देशाचे.

-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-04.06.2021-शुक्रवार.