"चारोळ्या पावसाच्या-भाग-३"

Started by Atul Kaviraje, June 05, 2021, 01:21:00 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

             "चारोळ्या पावसाच्या-भाग-३"
             ------------------------

1) बोचरा पाउस

पाउस बोचतो काट्याप्रमाणे
पाउस टोचतो भाल्याप्रमाणे
घायाळ,बंबाळ सल सहूनही ,
तो मला नेहमी हवा असतो .

2) गळणारे छत

आज मी वृद्ध आहे
आज माझ छत गळतय
पाहू दे त्याला, येण्याचे नाही थांबवणार
माझ छत मी असंच ठेवणार 

3) चिडणे पावसाचे

पावसाचे चिडणे, पावसाचे बिघडणे
स्वाभाविकच असत ते सार
पण मानव-जात नंतर भोगते,
जेव्हा घर वाहून जाते दूर-दूर.

4) दानी पाउस

काय पावसाला काय म्हणालात ?
अहो, त्याच्यासम दानी कुणीही  नाही
जीभ सांभाळून बोला आपली,
त्याच्यासारखा महात्मा कुणीही नाही.

5) धनी पाउस

धन-रुपी, अमृत-कुंभ भू-वरी
रिते करुनी पाउस जातो
निःसंग, सोबत काहीही न घेता,
चरा-चराला धनाचे दान देतो.

-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-05.06.2021-शनिवार.