🌻🥀 तू ❣️🌹

Started by jayarpita , June 05, 2021, 02:44:32 PM

Previous topic - Next topic

jayarpita

🌻 तू 🌹

मनी आले की वर्णावे तुला
म्हंटलं, चार ओळींत मांडावे तुला
पण चार ओळींत मावणार नाही,
असं व्यक्तिमत्त्व आहेस तू। 💯

आहेस तू गंध कस्तुरीचा
जणू काही स्पर्श मखमालीचा
अलगद सुखावून जाणारा,
मंद - मंद वारा आहेस तू।🥰

खळखळत वाहणारी सरिता आहेस तू 🏞️
स्वप्न दाखवणारी रजनी आहेस तू
असते नेहमी रूप तुझे तेजस्वी,
अवकाशात लुकलूकणारी चांदणी आहेस तू। 🌌

पाण्यापरी निर्मळ आहेस तू 💧
परिसाहूनही दुर्मिळ आहेस तू
सतत हवीहवीशी वाटे मनाला,
वाळवंटी जणू मृगजळच आहेस तू।

मृगनयनी डोळे तुझे 👁️
फुलांसम हास्य ते🌹
अंधारातही चमकत राहणारा
माझा चंद्र आहेस तू। 🌕🌙

jayarpita

मस्त कविता❣️✨

Atul Kaviraje

      जयार्पिता जी, बऱ्याच दिवसांनी एक सुंदर अशी, विशेषणांनी युक्त अशी, उदाहरणांनी नटलेली, सजलेली समर्पक अशी कविता आज माझ्या वाचनात आली. ती म्हणजे "तू" .

     चार ओळींतही न मावणाऱ्या अश्या तुझे वर्णन न करता आल्यामुळे आपणास ही कविता पाच कडव्यात ओवावी लागली. हे स्पष्ट दिसून येतंय. अतिशय सार्थ, अर्थपूर्ण कविता, म्हणून मी तिजकडे पहातो. या कवितेतलं तू च्या व्यक्तिमत्त्वात आपणास, मखमली कस्तुरी सुवास, सुखावणारा मंद वाहता वारा,खळखळ वाहणारी सरिता, स्वप्नदर्शिता रात्र, लुकलुकणारी तेजस्वी चांदणी, निर्मल जल, दुर्मिळ परीस, मरूस्थलातील मृगजळ, हरिणाक्षी नयन, कुसुम हास्य, तिमिरातील  तेजस्वी चंद्र, आणि बरंच काही दिसून आलं , आणि ते तुम्ही प्रामाणिकपणे आपल्या कवितेत गुंफलं.

     मला वाटतं, अजूनही भरपूर विशेषणांनी आपली हि प्रस्तुत कविता अजूनही छान रंगली असती, परंतु प्रत्येक गोष्टीला मर्यादा ही  असतेच . प्रत्येक कडव्यांसोबत आपण,  सिम्बॉल्स, लघुचित्रे यांचाही, समर्पक रित्या वापर करून या कवीतेस चार चांद लावले आहेत, आपला हा अभिनव प्रयत्न मला आवडला. सुंदर अति सुंदर. अजून काही बोलणे नाही.

     तुझ्यात मला राम दिसतो
     तुझ्यात मला श्यामही दिसतो
     साऱ्या गुणांनी युक्त तू
     तू फक्त माझाच असतो.

-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-०५.०६.२०२१-शनिवार.

jayarpita

अतुल कविराजे, आपले खूप खूप धन्यवाद की आपण मी रचलेली कविता इतकी मनापासुन वाचलीत...व आपले त्या वरील मत आपण आवर्जून व्यक्त केलेत... ते सुद्धा एवढ्या उत्तम पद्धतीने... खरंच आपले मनापासून धन्यवाद..🙏😍

मी काही कवी नाही, हा केवळ आपल्या मनातील भावना शब्दांतून मांडण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न..❣️

आणखी एक गोष्ट माझे मूळ नाव जय आहे..जयअर्पिता असे नाव ठेवण्याचे कारण म्हणजे.. त्या नावातील अर्पिता म्हणजेच माझ्या कवितेतील तू..🌹❣️

पुन्हा एकदा आपले आभार मानतो व माझे दोन शब्द संपवतो..🙏

काळजी घ्या.. सुरक्षित राहा...💯😇🙏

Rohan Rajendra Bhosale

खूप छान कविता आहे. माझं यूट्यूब वर चॅनल आहे. "प्रेम काव्य" नावाने. त्यावर मी माझे आणि बरेच कवी आणि कवियित्री चे कविता व्हिडिओ मार्फत प्रदर्शित करतो त्यांच्या नावासहित. तुम्ही इच्छुक असाल तर मला ७७७७०९२२९७ ह्या नंबर वरती तुमची कविता पाठवू शकता.