"तुझी बेभान चाल सजणी"

Started by Atul Kaviraje, June 07, 2021, 01:34:05 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

     अवखळ  वाऱ्यावर  विहरणारी  आणि  त्याहूनही  अवखळ , सुंदर  अशी  आपली   प्रेयसी  पाहून  प्रियकराला  काहीतरी  सुचतंय. ते  तो  आपल्या  शब्दांत  व्यक्त  करीत  आहे.  प्रेयसीचे  स्वैर , मुक्त , स्वच्छंद  असे  वर्तन  त्याला  कमालीचे  आवडतंय  असं  दिसतं. ऐकुया  तर  एक  अशीच  मुक्त, प्रेम  कविता.  कवितेचे  शीर्षक  आहे  - "तुझी  बेभान  चाल सजणी"

                    मुक्त प्रेम कविता
               "तुझी  बेभान  चाल सजणी"
               -----------------------

अवखळ पवन घालीतसे रुंजी
पदर उडवीत खेळतसे अंगी
सांभाळ लतिके तुझे हे चालणे,
डगमगत्या पावलांनी तुझे हे उतरणे.


भान विसरुनी मुक्त विहरतेस
मध्येच रुळणाऱ्या बटाना मागे तू सारतेस
आज भरते तुला आनंदाचे कसले ?
मुक्त हास्यात तू आणिक मोहक दिसतेस.


चंचल चपल हे संपदे तारुण्य तुझे
सांभाळ स्वतःस, कुणी कुमार करील हरण तुझे
अशीच मुक्त निर्बध स्वैर उमलत रहा,
जीवन गाणे तराणे नित गात रहा.

-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-07.06.2021-सोमवार.