पाऊस कविता - "ये, पावसा धावत ये"

Started by Atul Kaviraje, June 07, 2021, 02:36:00 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

     मित्र / मैत्रिणिनो, आपणा सर्वाना शुभ दुपार, कालपासून पाउस पडत आहे, सगळ कस प्रसन्न वाटते आहे, गारवा आलाय, वातावरण थंड झालंय, मनही शांत झालंय. आजची सकाळ येताना पाउस घेऊन आली आहे, तेव्हा आजच्या सकाळवर व तिने आणलेल्या पावसावर एक कविता सुचली आहे, ऐकवतो. - कवितेचे शीर्षक आहे -  "ये, पावसा धावत ये"

                       "ये, पावसा धावत ये"
                       ------------------

ये, पावसा धावत ये
अमृत-थेंबाचा कलश भरुनी
भू-वरी तो सांडत ये,
ये पावसा धावत ये.


ये, पावसा धावत ये
रस्ता चिंब भिजवीत ये
छपरावरून लोळण घेउनी,
भिंतीवरुनी ओघळत ये.

ये, पावसा धावत ये
कळ्या-फुलांना फुलवत ये
झाडे-फांद्यांना झुलवत ये,
श्रुष्टीस नव्हाळी देत ये.


ये, पावसा धावत ये
सागरास तू कवेत घे
नदी नाले ओढ्यासवे,
तलावास तू भरीत ये.


ये, पावसा धावत ये
कड्यांवरून कोसळत ये
धबधब्यातून फेसाळत ये,
कातळा-सवे खेळत ये.


ये, पावस धावत ये
चरा चरासी भिजवीत ये
या दैवी सिंचनाने तू,
सृष्टीस न्हाऊ घालत ये.


ये, पावसा धावत ये
मना प्रेमे आलिंगित ये
तनुवरी मम रोमांच फुलवीत,
सकाळची तू नांदी दे.


     चला तर मित्रानो आपण या पावसाच्या स्वागतास सज्ज होऊया, या पहाटेच्या, या रम्य सकाळच्या स्वागतास सज्ज होऊया, पावसाकडून भरभरून घेऊया, व दुसऱ्यालाही भरभरून देऊया.

-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-07.06.2021-सोमवार.