स्त्री-पुरुष चारोळ्या - "अभिन्न अंगच पुरुषाचे, स्त्री"

Started by Atul Kaviraje, June 07, 2021, 03:02:56 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

     स्त्री पुरुष, संसार रुपी  रथाची दोन चाके. संसार सुरळीत होतो तो या दोघांमुळेच. यातील कुणीही उजवे नाही कि डावे नाही. दोघांना एकमेकांची  गरज असते. आजची स्त्री ही पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून कित्येक क्षेत्रात उतरली आहे. नव्हे, तर ती कांकणभर सरसही ठरली आहे. चूल आणि मूल सांभाळून ती बाहेरच्या क्षेत्रात आपली जबाबदारी खंबीरपणे, समर्थपणे उचलत आहे. या विषयावर काही चारोळ्या तुम्हाला ऐकवितो.

                      "अभिन्न अंगच पुरुषाचे, स्त्री"
                      ------------------------

( १ )
झेपावलीय उंच उंच नभी
कर्तृत्त्वाचे पंख लावून भरारत
दिव्यत्त्वापुढे तिच्या आकाशही झुकलय,
धन्य स्त्रिये, तुझी धन्य ती मूरत.


( २ )
स्त्री-पुरुष नाही येथे भेद
जन्म-स्त्रीचा म्हणुनही नाही तिला खेद
मूक आक्रंदन करीत सारे सहावे ?
आज तिनेही का मागे राहावे ?


( ३ )
सर्व नात्यांचे मूळ स्त्रीच
सारी नाती तिने जोपासलीत
दुय्यम ( ? ) दर्जाचे स्थान असूनही,
अश्रूंची तिच्या फुले झालीत.


( ४ )
अर्धांगिनी, सह-चारिणी, साता-जन्मांची सोबतीण
अशी ही असता सद-विवेकी भार्या
सुख-दुखात असते पुरुषाच्या बरोबरीने,
स्वतेजाने फिके ठरते सूर्या.


( ५ )
रथचक्र संसाराचे अविरत फिरते
स्त्रीची मिळते सोबत पुरुषाला
जुलूम सहूनही पुरुषाचे इतके,
प्रदक्षिणा घालते वडाला, वट-पौर्णिमेला.

-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-07.06.2021-सोमवार.