मती-मंद मुलांवर आधारित कविता - " हे रोपटं जपायला हवं "

Started by Atul Kaviraje, June 08, 2021, 01:54:40 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र / मैत्रिणिनो,

     आज तुम्हाला एका वेगळ्या धर्तीवर कविता ऐकवीत आहे, " अपंग मुलांच्या,व्यंग्य असलेल्या बालकांच्या जीवनावर " हि अपंग मुले, अवेळीच खुडली जातात, पायदळी तुडवली जातात, या कळ्यांचे कधीच पूर्ण फुल होत नाही, आई -वडील मुलांना जन्म देतात, पालन पोषण करतात त्यांना मोठे करतात, हे झाले नॉर्मल , साधारण मुलांच्या बाबतीत, मग अश्या या अपंग मुलांच्या  बाबतीतच असे का ? त्यांना काहीही अधिकार का नाही. ते अपूर्ण असले, ते अविकसित असले म्हणून काय झाले, त्यानाही पूर्णत्त्व हवे असते. त्यांनाही आपला विकास व्हावासा वाटतो. या मुलांना मग असे आई- वडील कुठल्यातरी अनाथाश्रमात फेकून देतात. त्यांचा सांभाळ न करता ते उलट त्यांचा त्याग करतात असे का या अशा मुलांची जबाबदारी ते का घेऊ शकत नाहीत, या कळ्यानाही  फुलण्याचा , जगण्याचा अधिकार आहे.


     आता आपली जबाबदारी कि हे अविकसित रोपट आपल्याला जपायला हव , ते जगवायला हव. पूर्ण नाही तरी आपण त्यांची थोडी तरी जबाबदारी उचलली तरी एक समाज-सेवा केल्याचे काम, एक माणुसकीचे काम केल्याचा आनंद नक्की मिळेल.


     चला ऐकुया तर हि डोळ्यांत अश्रू आणणारी,हृदय हेलावणारी, भाव-विवश , भाव-व्हीवळ करणारी कविता.

                          " हे रोपटं जपायला हवं "
                          ---------------------

हे रोपटं जपायला हवं
हे रोप जगवायला हवं
वाढवून, हळुवारपणे फुलवून त्यांच्याशी,
माणुसकीचे नाते जोडायला हवं.

     दोष तयांचा काय यात ?
     निसर्गानेच घडवलंय त्यांना असं
     खुडलं असलं म्हणून का,
     टाकून, फेकून द्यायचं त्याना ?

हक्क त्यांनाही जग पहायचा
वाऱ्यापाठी धावण्याचा, मुक्त बागडण्याचा
असतील अशी कितीतरी बालके,
ज्यांना हवाय हात आधाराचा.

     अपूर्णत्त्वाची भावना, अविकसित तन
     अर्ध-शरीरातही आहे, एक मन
     पुकारती हस्त उंचावून आम्हा,
     अधिकार आम्हालाही जीवन जगण्याचा.

एका आपुलकीसाठी उसासलीत ती
एका स्पर्शासाठी आतुरलीत ती
फक्त प्रेमच हवंय त्यांना,
फक्त जिव्हाळाच हवाय त्यांना.

     जबाबदारी आपली,अर्ध-विकसित कळ्यांना
     एका हसऱ्या फुलात फुलविण्याची
     आशेचे किरण सोनेरी रुजवून,
     त्यांची सुप्त उमेद वाढविण्याची.

आहे त्यांच्यातही ईश्वराचा अंश
आधार देऊ टाकण्या पाऊले
निष्पाप बालकांच्या सेवेने निसंशय,
ईश्वराशीच जुळेल आपुले नाते.

     त्यांना आपलं म्हणायला हवं
     त्यांचं दुःख घ्यायला हवं
     हे रोपटं जपायला हवं,
     एका वृक्षात घडवायला हवं.

-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-08.06.2021-मंगळवार.