सायंकाळचे चित्रण - कविता - "अनोखी अनुभूती सायंकाळची "

Started by Atul Kaviraje, June 09, 2021, 12:25:58 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

    मित्रानो , दर -रोज सकाळ येते ,तशीच संध्याकाळही. हि संध्याकाळ पुन्हा पुन्हा येते आणि ती आपण पुन्हा पुन्हा पाहतो. हे जीवन चक्र असेच सुरु आहे. अगदी  आदींपासून अंतापर्यंत. अचूक आणि अबाधित, युगान युगे. या अनोख्या संध्याकाळचे चित्र  मी कवितेतून रेखाटले आहे. ऐकुया तर कविता- कवितेचे  शीर्षक आहे - "अनोखी  अनुभूती  सायंकाळची "

                        "अनोखी अनुभूती सायंकाळची "
                        ---------------------------


थोड्याच वेळात संध्या अवतीर्ण होईल
छायेचे सुंदर खेळ सुरु होतील
सरती उन्हे मग तनुस सहवतील,
गार पवन नांदी घेऊन येईल.



प्रकाशाची तिरपी किरणे पखरतील
जणू आपलीशी मायेची पाखर घालतील
आपले हे सुंदर रूप घेऊन,
संध्याकाळ मग हळू हळू अवतरेल.


जीवन हळू हळू मंद होईल
पाखरे आपल्या घरट्यात परततील
थकलेला भागलेला जीव हलकेच,
विश्रांतीचा आडोसा जवळ करील.


तो जीवन दाता अस्तास जाता
आपले प्रतिबिंब सागरास अर्पिल
निसर्गाचे हे दिन रातीचे चक्र,
नित अव्याहत असे सुरूच राहील.


     मित्रानो, अशी ही संध्याकाळ पुन्हा पुन्हा  येईल आणी आपण सारे ती पुन्हा पुन्हा पाहू
हे जीवन चक्र असेच सुरु राहील अगदी आदि - पासून अंतापर्यंत अगदी अचूक, अबाधित, युगानु युगे.

-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-09.06.2021-बुधवार.