पाऊस कविता - " रिमझिम रिमझिम बरसात गातो "

Started by Atul Kaviraje, June 09, 2021, 11:33:22 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

 मित्र/मैत्रिणिनो,
      अजून एक कविता पावसाची, माझ्या उद्दात्त मित्राची. पावसाळा संपेपर्यंत अश्याच पावसावर आधारित कविता तुम्हाला ऐकविण्याचा मी मनी निर्धार, संकल्प घेतला आहे. कारण पाऊस माझ्या अत्यंत आवडीचा, जिव्हाळ्याचा असाच विषय आहे.

     प्रस्तुत कवितेत माझ्या अंगणातला पाऊस, याचे विस्तृत विवेचन केले आहे. ते तुम्हाला आवडेलच. जास्त काही न बोलता, थेट कवितेलाच सुरुवात करतो. माझ्या कवितेचे शीर्षक आहे -
" रिमझिम रिमझिम बरसात गातो "

                          " रिमझिम रिमझिम बरसात गातो "
                          ------------------------------

तनुवर हलकेच देत शिरशिरी
उदास मना संतोषित जातो
माझ्या अंगणी पाउस येतो,
रिमझिम रिमझिम बरसत गातो.


डोलवित,कुरवाळीत हरित-तृणा,समीर
तुषार-कणा, गारव्याची साथ देतो
सुमधुर शिळ घालीत सवे,
पवन अंगणी फेर धरितो.


टप-टप टपोऱ्या गारा-शुभ्र वर्षावीत
सहस्त्राधारा रूपे धरतीस आलिंगितो
येथेच थांबावा काळ, वाटता,
निसर्गाचे अनिमिष रूप साठवितो.


कमानीस, दाराच्या हलकेच,लोडून
सप्त-सुरांच्या मैफिलीत भान विसरतो
माझ्या अंगणी पाउस येतो,
रिमझिम रिमझिम बरसत गातो.


     मित्रानो तुमच्याही अंगणी असाच पाउस येवो, आणि तुम्हालाही हा अपूर्व, अनोखा अनुभव येवो.

-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-09.06.2021-बुधवार.