कोरोना चारोळी संग्रह

Started by कदम, June 10, 2021, 04:12:18 AM

Previous topic - Next topic

कदम

कोरोना चारोळी संग्रह
💐💐💐💐💐💐💐
कोरोना म्हणजे युद्ध
कोरोना म्हणजे युद्ध
लयच ढोंगी आहे हो चीन
त्याचं भांडण पण शास्ञशुद्ध
💐💐💐💐💐💐💐
कोरोना रोग आहे खुप वैशी
कोरोना रोग आहे खुप वैशी
आता म्हणे त्याला खायच्या
आमच्या पांढर्या पेशी
💐💐💐💐💐💐💐
इथे मास्क आणि
सॅनिटायझर मिळेल
कोरोना तुमच्यापासून
दुर दुर पळेल
💐💐💐💐💐💐💐
गावभर फिरतो कोरोना
बाधीतांचा घोळका
लावून घेवू नका कोणी
तुम्ही त्यांचा पुळका
💐💐💐💐💐💐
आजच्या वर्षाचे फक्त
एकच टास्क
सॅनिटायटर वापरणे
आणि लावणे मास्क
💐💐💐💐💐💐💐
कोरानाने पुकारले
मानवते विरूद्ध बंड
घराबाहेर पडु नका
राहुद्या थोडा खंड
💐💐💐💐💐💐💐
कोवीड १९ ने घडवली
जागतिक आणीबाणी
सामान्यं जनता काय करणार
तनला मिळत नाही प्यायलाही पाणी
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
कोरोनाचं सावट वाढतच गेलं
कोरोनाचं सावट वाढतच गेलं
सामान्यांच्या नशिबी लाॅकडाऊन
आणि प्रेताचं गिफ्ट आलं
💐💐💐💐💐💐💐💐💐
कोरोना पासून बचावचे
नारे लावले खुप
कोरोना पासून बचावचे
नारे लावले खुप
मेल्या कोरोनाने घेतले
जगभर विक्राळ रूप
💐💐💐💐💐💐
-कदम.के.एल.
(कुमार्कवी)

Atul Kaviraje



     कदम (कुमारकवी) सर, आपल्या प्रस्तुत कोरोना चारोळ्या, या सद्य स्थितीवरील आपले चांगलेच टिपण आहे.  या "कोरोना चारोळी संग्रह" तून आपण, कोरोनाच्या जागतिक घडामोडी,चीनचा यात असणारा स्पष्ट हात, कोरोनास दूर ठेवण्यासाठी सरकारने वेळावेळी दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन,या महत्त्वपूर्ण बाबींचा उल्लेख अतिशय उत्तम रित्या केला आहे.

     कोरोनास दूर ठेवण्यासाठी, लौकडाउन, लसीकरण, मुखवटा धारण, सॅनिटाइझराने वेळोवेळी करावयाचे हस्त-प्रक्षालन, सामाजिक अंतर, या गोष्टी जरी शास्त्रशुद्ध असल्या तरी, समाजात असणारी एकात्मता, एकमेकांना समजून घेणे, एकमेकांची मदत करणे, संकटात धावून जाणे, ( अर्थात वर दिलेल्या सर्व गोष्टी पाळूनच), या गोष्टींचे आपण जनतेने पालन केले, तर काय बिशाद आहे, कोरोनाच्या अति-आक्रमणाची. मी तर म्हणेन यापुढे कोरोनाची एकही लाट नाही आली तर त्यात नवल ते काय ?

     चला तर आजपासूनच एकमेकांना हात देऊ, एक होऊ, आणि या संकटास कायमचे पळवून लावू.
कदम सर, अश्याच समाज-प्रबोधित कविता, चारोळ्या लिहीत जाणे.

     कोरोनाने ग्रासलंय साऱ्या जगता
     जागतिक स्वास्थ्य-व्यवस्था टेकविते माथा
     संकटात नाही का कुणी त्राता ?
     वाचवेल आम्हा कोण आता ?

     सारे नियम झाले पाळून
     परि, कोरोना नाही गेला पळून
     मागे पहाता कळले वळून,
     भाकीत टाकतेय आकाश झाकोळून.

     कोरोना आपलं बदलतोय स्वरूप
     लशींचेही बदलावे लागतंय रूप
     किती काळ लौकडाउन होणार,
     आर्थिक मंदी येतंच राहाणार.

     मानव आहे बुद्धिमान प्राणी
     त्यापुढे टिकेल का कुणी ?
     क्षुद्र विषाणू-जिवाणू कीटक हा,
     संहार घडवतोय भयानक महा.

     संकटास लावण्या परतून या
     मानव-जातीने एक होऊया
     हस्ताने गुंफावी साखळी एकत्र,
     मदतीचा हात देऊन सर्वत्र.

     एकीचे बळ काम करील
     कोरोनास त्या मात देईल
     आता गरज एकत्र येण्याची,
     सर्वांगाने माणूस, माणुसकी जपण्याची.

     असेच यापुढे संघटित राहू
     प्रत्येक संकटाशी लढा देऊ
     नको ती जात-पात, भेद-भाव,
     विसरुया सारा आप-पर भाव.

     उद्याचा सूर्योदय असेल नवा
     पखरीत प्रकाश, देत उल्हासाचा ठेवा
     अमंगळाची काळ-रात्र  सरेल,
     दिवसाची मंगल सुरुवात होईल.

-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-१०.०६.२०२१-गुरुवार.