पावसात

Started by शिवाजी सांगळे, June 10, 2021, 03:31:28 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

पावसात

मी चिंब भिजावे....एकदा पावसात
तु चिंब भिजावे..माझ्या सहवासात

असूनही एक छत्री जवळ दोघांच्या
आपण भिजावे..घेऊन हात हातात

अविस्मरणीय ठेव रम्य या क्षणांची
राहो सदोदित आपल्याच स्मरणात

स्वप्न पाहिले दरवेळी सत्यात यावे
सर्व हे वाटते घडावे रोज जीवनात

तृषार्त असते मन, धरणी एकीकडे
चिंब भिजावे दोघांनी या पावसात

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

Atul Kaviraje

     शिवाजी सर, खरं आहे, पाऊस हा एकच असा ऋतू आहे, कि जो दोन जीवांचे मिलन घडवितो, दोघांना एकत्र आणतो, दोघांचे प्रेम फुलवितो. काहीतरी वेगळेपण, अनोखेपण, काहीतरी जादू या पावसात नक्कीच आहे, जी  आजवरही कोणा उमजलेली नाही, अनाकलनीय अशी आहे.

     आपल्या, "पावसात", या प्रेम कवितेतून, आपण या प्रेमी जीवांची होणारी तगमग, तळमळ, स्वप्न सत्यात उतरण्याची  कळकळ , ही हुबेहूब चित्रित केली आहे. असा हा पाऊस आपलेपणा जपणारा, सर्वां एकत्र करणारा, समेट घडवून आणणारा, वैर विसरिवणारा, प्रेम जपणारा, प्रेम फुलविणारा असाच आहे.

     शिवाजी सर. आपली ही छोटीशी पावसाची कविता छान आहे. मोजक्याच शब्दात आपण ती वर्णिली आहे. 

     प्रेम नकळत होत जाते पावसात
     प्रेम नकळत फुलत जाते पावसात
     भावनांचे पीक पेरून मना-मनांत,
     शिवार प्रेमाचे बहरते गात्रा-गात्रांत.

-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-१०.०६.२०२१-गुरुवार.

शिवाजी सांगळे

नमस्कार अतुल कविराजजी, आपली उस्फूर्त प्रतिक्रिया फार बोलकी आणि प्रेरणादायी आहे त्याबद्दल आपले मनापासून आभार. सोबत आपण लिहिलेली चारोळी देखील खुप सुंदर आहे.

असाच लोभ असावा, पुनश्च एकदा धन्यवाद🙏
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

शिवाजी सांगळे

नमस्कार अतुल कविराजजी, आपली उस्फूर्त प्रतिक्रिया फार बोलकी आणि प्रेरणादायी आहे त्याबद्दल आपले मनापासून आभार. सोबत आपण लिहिलेली चारोळी देखील खुप सुंदर आहे.

असाच लोभ असावा, पुनश्च एकदा धन्यवाद🙏
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९