" चारोळ्या पावसाच्या-भाग-५ "

Started by Atul Kaviraje, June 10, 2021, 06:59:22 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                           "चारोळ्या पावसाच्या-भाग-५"
                           -------------------------

1) अजानुबाहू पाउस

पहाता-पहाता मुसळधार पावसाने
पर्वत-शृंखलासी अपुल्या बाहूंत घेतले
अंगा -खांद्या वरून कोसळत तयांच्या,
धब-धब्यास पितृत्त्व बहाल केले.

2) पावसाची कमाल

त्याच्या दैवी चमत्कारापुढे
माणूसही गुडघे टेकतो
गर्वाचे हरण होत त्याच्या,
पावसाकडून तो बरंच काही शिकतो.

3) पाउस समुद्र-काठचा

क्षितीजावरुनी सोसाट पवनासवे 
हसत-खिदळत पाउस येतो
सागर-लाटांवरी नर्तन करुनी,
सागर-मातीचीही तृष्णा भागवतो.

4) माझे भिजणे

उगाचच मी भिजत रहातो
माझी शिक्षा भोगत रहातो
केलेल्या कृत-कर्मांचे मग,
पाप-क्षालन करीत रहातो.

5) पाउस व शीळ

पर्ण-राई-तून  शीळ घुमली
पवानासंगे मधुर झाली
टप-टप थेंबांची सुरुवात होऊन,
ती पहा वर्षा-राणी आली.

-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-10.06.2021-गुरुवार.