वास्तव-वादी सामाजिक कविता - " धोकादायक ठिकाणे, जातोय जीव अकारणे !"

Started by Atul Kaviraje, June 11, 2021, 12:07:48 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र / मैत्रिणींनो,

     मुंबईतील अजून एक शोकांतिका, म्हणजे, निष्काळजीपणाने पावसाळ्यात उघडी ठेवलेली गटारं किंवा नाल्याची झाकणे. आताच बातमी ऐकली, ती म्हणजे कालच्या  भर सकाळी,  पाणी तुंबून न दिसल्यामुळे एका व्यक्ती गटारात पडली, व ती वाहून जाऊन तिचा बुडून मृत्यू झाला. अश्या धोकादायक ठिकाणी, काही  निशाण किंवा खूण जर लावली गेली असती, की, " येथे धोका आहे, जपून जा ", तर निश्चितच त्या व्यक्तीचा जीव वाचला असता.

     परंतु हे कधीच होत नाही. अश्या अनेक दुर्घटना दर वर्षी घडतात. आता ही सर्वस्वी  जबाबदारी कोणाची? काही पूर्व नियोजित काळजी घेणे , किंवा अश्या घटना पुन्हा घडू नये, सर्वस्वी कायमचे उपाय, जर या बाबतीत केले गेले ,तर निष्पाप लोकांचे जीव तरी वाचतील, याचा सर्वांगाने विचार होणे गरजेचे आहे.

     असो, या उपरोक्त गंभीर, सामाजिक विषयावर मला सुचलेली एक कविता तुम्हाला ऐकवितो.
माझ्या कवितेचे शीर्षक आहे- " धोकादायक ठिकाणे, जातोय जीव अकारणे "

                                         वास्तव-वादी सामाजिक कविता
                                 " धोकादायक ठिकाणे, जातोय जीव अकारणे !"
                                 -----------------------------------------

आमची मुंबई, सुंदर मुंबई
देते आम्हा सर्व काही
स्लोगन आहे परिपूर्ण अर्थाचे,
मुंबईचे लक्षण आहे जिवंतपणाचे.

     पावसाळा आवडता ऋतू साऱ्यांचा
     खऱ्या अर्थाने  जीवन जगण्याचा
     परि मुसळधार पाऊस, महापूर देऊन
     प्रसंग येतो, हकनाक मरणाचा.

मुंबईची होते तुंबई जेथे
पाऊस होतो ढग-फुटीने, सर्वांगाने
आणि प्रलयच होतो इथे,
होतात जलमय झाडून  सारे रस्ते.

     निचरा नाही, रस्ते तुंबलेले
     सफाई नाही, कचऱ्याचे ढीग लागलेले
     हीच का आमची सुंदर मुंबई,
     ही तर अनपेक्षित झालेली तुंबई.

शोकांतिका एक याच रस्त्यांवरली
निशाणी नाही, एखादी खूणही नाही
वाहून जातो, आकस्मिक बुडून मरतो,
गटारांवरली झाकणे, उघडी राही.

     जीव का इतका स्वस्त ?
     कुणाचा हा सर्वस्वी दोष ?
     कुणाचा निष्काळजीपणा हे घडण्याला ?
     आहे कोण जबाबदार याला ?

पूर्व-नियोजन ठरते साफ अनुत्तीर्ण
निचऱ्याची व्यवस्था कधी होईल उत्तीर्ण ?
वस्त्या घनदाट, रस्ते अरुंद,
कधी थांबेल हा हकनाक आक्रन्द ?

     उचित योजना राबविण्यास हवी
     उल्लेखनीय कामगिरी व्हावयास हवी
     योग्य ती पाऊले उचलून
     चालणारी पाऊले सुरक्षित राहावयास हवी.

तरच हे चित्र बदलेल
मुंबई ही मुंबईच राहील
तिची तुंबई होणार नाही
अन, हकनाक बळी जाणार नाही.

-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-११.०६.२०२१-शुक्रवार.