फूलं आणि थडगे

Started by aspradhan, March 14, 2010, 09:37:26 PM

Previous topic - Next topic

aspradhan

     
फूलं
आणि थडगे
थडगे-
       ढाली तुजवरी प्रशांत समयी जे अश्रू जोतीष्मती
त्याचे तू करितेस काय कुसूमा? सांगे मला सत्वरी
     फूल
     मित्र सांग! तुझ्याही कुक्षी कुहरी जे जीव संवेषति
      त्यांचे तू करितेस काय न काळे अद्याप माते तरी
     अश्रुंचे रमणीय अत्तर नवे मी निर्मिते कौश्यले
     त्याने नादावतो प्रभात समयी सर्वत्र गुंजा ध्वनी !
थडगे
  माझ्या उदरामध्ये आजवरी जे जीव बा  पातले
त्यांचे मी करी देवदूत, सकला हि गोष्ट  आहे जुनी   
  एकनाथ पांडुरंग रेंदाळकर