पर्यावरण कविता - "जतन करूया झाडांचा वारसा "

Started by Atul Kaviraje, June 11, 2021, 06:02:11 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र /मैत्रिणींनो, ,

     कालच  सरकारकडून  एक  आनंदाची  बातमी  आली , कि  ज्या  झाडांनी  वयाची  पन्नास  वर्षे  पूर्ण  केली  आहेत , त्यांचा  हेरिटेज  ( वारसा ) म्हणून  यापुढेही  जतन  व्हावे , जोपासना व्हावी . ऐकून  छान  वाटले . शेवटी , या आधी बऱ्याच वर्षांपूर्वी  वृक्ष -प्रेमींनी   , झाडे  जगविण्यासाठी , वृक्ष  वाचविण्यासाठी  जी  झाडे -आलिंगन  मोहीम  राबविली  होती , ती  आज  सुफळ , सफल  होतेय , हे  पाहण्याचे  भाग्य  आम्हा  लाभत  आहे .

     चला , सुरुवात  तर  चांगली  झालीय . आता  यापुढे  वृक्ष  तोडणाऱ्या  विघातक  वृत्तींना  कायमचाच  आळा  बसेल , त्यांना  शंभर  वेळा  विचार  करावा  लागेल .वृक्ष  संपदा  ही आपली  धरोहर , ती  जंगलाची  शोभा  आहेत , हे  स्लोगन  फक्त , "झाडे  लावा -झाडे  वाढवा ", पर्यंतच  मर्यादित  नसून  त्याचे  रूपांतर  "झाडे  जपा , झाडे  वाचवा " यात  झाले  आहे .

     उपरोक्त  विषयावर  एक  सहज  सुचलेली  कविता , पर्यावरण  प्रेमींना  नक्कीच  आवडेल .
माझ्या  कवितेचे  शीर्षक  आहे -" जतन  करूया  झाडांचा  वारसा "

                              पर्यावरण  कविता
                      " जतन  करूया  झाडांचा  वारसा "
                      ------------------------------


वृक्ष आहेत वन-जंगल संपदा
हिरवाईने नटलेले, जीवनाचे प्रणेते
कर्तव्य अपुले अग्र-हक्क देऊन,
जतन करूया झाडांचा वारसा.

झाडे लावूया ,झाडे वाढवूया
नाही इथेच कार्य संपत
झाडे जपूया, झाडे वाचवूया
हेच खरे ध्येय बाळगूया.

वृक्ष संवर्धन व्हावया जातीने
प्रत्येकाचे जाणीव-पूर्वक हवे लक्ष
पहा फुलेल नंदनवन हिरवे-गार ,
अथक प्रयत्ने वाळवंटीही रुक्ष.

वृक्ष आहे माणसाचा खरा मित्र
कित्येक पिढ्या जपल्यात आजवर
आपलेही  कर्तव्य त्याला पाहण्याचे ,
काळजी घेण्याचे ,अन आपलेपणा जपण्याचे .

वृक्ष -तोड  समाज -विघातकांना   
शासन  करावे  या शासनाने
या प्रवृत्तींना बसून आळा,
मग फुलेल पहा घनदाट मळा .

झाडे आहेत अपुले खरे मित्र
झाडे आहेत अपुले जीवन-स्रोत
या वन-संपत्तीस आपण जपूया,
पर्यायाने एक सुंदर जीवन जगूया .

वृक्ष प्रेमींना आज भरून आलंय
डोळ्यांत  त्यांच्या  पाणी तरारलंय
झाडे जगवून , त्यांचा वारसा  जपून ,
त्यांच्या प्रयत्नांचं  चीज  झालंय .

सारे  एक शपथ  वाहूया
यापुढे  ही वृक्ष - तोड थांबवूया
एक धरोहर, एक वारसा जपत ,
वृक्षांचे  सहृदय  संवर्धन  करूया.

-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-11.06.2021-शुक्रवार.