वन्य-प्राणी जीवन कविता - " वाघ वाचवा , वन्य-जीवन वाढवा "

Started by Atul Kaviraje, June 12, 2021, 12:25:54 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     दोन दिवसांपूर्वीच यु - ट्यूब वर वन्य-जीवन म्हणजे वन्य - प्राणी, वाघ, चित्ते इत्यादी प्राण्यांची नामशेष होणारी जात-जमात वाचाविण्यासाठी, आवाहन केले गेले होते. आणि  ते खरंही आहे. गेल्या कित्येक वर्षांत आपण आपल्या भारत देशात जेव्हढी वन्य-उद्याने, वन्यविभाग, किंवा जंगल-विभाग आहेत,तेथे या वन्य प्राण्यांचा वावर फारच कमी होताना पहात होतो. पाश्चिमात्त्य देशांच्या मानाने, आपल्या भारत देशात वाघ, चित्ते, सिंह या वन्य प्राण्यांचे प्रमाण कमी होत असल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे.

     सोशल मीडिया वर, न्यूज चॅनेल वर या-बाबत काही चर्चा - सत्रात , काही मुद्दे मांडून हा विषय कसा युद्ध पातळीवर सोडवून, या वन्य प्राण्यांच्या जाती वाचविण्यासाठी, त्यांचे संवर्धन होण्यासाठी ,त्यांचे रक्षण होण्यासाठी काय काय पाऊले उचलावी लागतील, यावर चर्चा  झाल्याचे  दिसत होते. मला असं वाटत, कि लवकरात लवकर सरकारने त्यांची नामशेष होणारी जात-जमात, वाचविण्यासाठी, व पर्यायाने त्यांच्या कळपात वाढ होण्यासाठी, भविष्यात काही ठोस पाऊले उचलण्याची सत्त्वर गरज आहे.

     असं जर भविष्यात घडलं, तर आपण अश्या सुंदर वन्य-जीवनास बिलकुल मुकणार नाही, प्राणी-मित्रानीही या कामात हिरीरीने भाग घेऊन, त्यांच्या संरक्षणार्थ आवर्जून प्रयत्न करावेत. मित्रानो, या विषयावर एक कविता रचली आहे. माझ्या कवितेचे शीर्षक आहे -" वाघ  वाचवा , वन्य-जीवन  वाढवा "

                       वन्य-प्राणी जीवन कविता
                 " वाघ  वाचवा , वन्य-जीवन  वाढवा "
                 --------------------------------

पित रंगांवर, दाट काळे पट्टे
अजस्त्र धूड, अंगाने  धट्टे - कट्टे
चपळाई अशी, गती वाऱ्यासम,
देखणे वन्य-जनावर, चाल नजरेत भरावी.

या वन्य-प्राण्याची आज दिसतेय वानवा
गडप होतोय हा वन्य-जीवन ठेवा
रोडावत चाललीय त्यांची संख्या
नामशेष होत चाललाय वाघांचा कळप

दिमाखात होते वावरत केव्हातरी जनावर
भक्ष्यापाठी  दौडत होते,जात चालून सत्त्वर
आज जंगल मूकतय या वन्य प्राण्यांना
कान आसुसलेत त्यांच्या डरकाळ्यांना.

का कमी होतेय त्यांची संख्या ?
का कमी होतोय त्यांचा जंगल वावर ?
का नामशेष होतोय हा प्राणी ?
याचे उत्तर देईल का कुणी ?

वाघ-चित्ते जंगलाची प्राणी संपदा
ते नाहीत तर जंगलाची शान नाही
विलुप्त झाल्या जमाती त्यांच्या,
तर हे जंगल भकास होई.   


योग्य पाऊले उचलावयास हवीत
नामशेष, विलुप्त होण्यापूर्वी वन्य-प्राणी
संवर्धन त्यांचे विचार-पूर्वक होण्या
पुढे यावे, प्राणी-मित्रानीही. 

जंगले राखावीत, जंगले वाचवावीत
वन्य-प्राण्यांना ठेवण्या सुरक्षित
अभय मिळावे, शिकार न व्हावी,
कळप वाढविण्या योजना असावी.

या दुर्मिळ जनावरा पाहण्या मग
जंगल सफारीचे निमित्त होईल,
कळपा-कळपांतून फिरताना त्यांचे
सहजच दुर्लभ दर्शन होईल.

-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-12.06.2021-शनिवार.