नवीन नवल कविता - " एक दोन नाहीत , झालीत दश -बाळे "

Started by Atul Kaviraje, June 12, 2021, 02:13:00 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र /मैत्रिणींनो,

     कालच  यु -ट्युब  वर  बातमी ऐकली , एका  आफ्रिकन  गृहिणीने एक नव्हे , दोन  नव्हे , तर चक्क  दहा  मुलांना  जन्म  दिला . मी त्यास गमतीने , दहा -बाळे  किंवा  "दशावळे " , असेही  म्हणेन . निसर्गाचा  हा  अविश्वसनीय  चमत्कार  म्हणावयास  हरकत  नाही, एकप्रकारे  या गृहिणीने  दहा  मुलांना  जन्म  देऊन एक जागतिक  रेकॉर्डच  केला  आहे, आणि विशेष   म्हणजे  सारी  नवजात  अर्भके  ही आईसह  सुरक्षितही  आहेत.

     न्यूज   चॅनेल  वर  आणि  सोशल  मिडिया वर  ही बातमी चांगलीच  व्हायरल  झाली होती.  एक कविता मला  या विषयावर  सुचली  होती. चला तर ऐकुया ही विशेष ,वर्ल्ड  रेकोर्ड  ब्रेक  करणारी  कविता. माझ्या  कवितेचे शीर्षक आहे- " एक दोन नाहीत , झालीत  दश -बाळे  "

                         नवीन  नवल  कविता
               "एक दोन  नाहीत , झालीत  दश -बाळे"
               ----------------------------------

काय  घडेल  जगात  रोज
काहीही  सांगता येत  नाही
पाहूया  जगातील आणि एक आश्चर्य ,
अन  नव्याने  घडलेली एक नवलाई .

आफ्रिका  देशी  आलीत  जन्माला
एक  नाही , दोन  नाही  तर  चक्क  दशावळे 
प्रकृतीचे , निसर्गाचे  एक वरदान,
त्या  मातेस , जिने  प्रसवली  दहा -बाळे .

अशी  सोशिकता  स्त्रीतच  दिसते
सलाम  माझा त्या मातेस
जिने  नऊ  मासी  कसोशीने  सहुन,   
जपणूक  केली, गर्भांची उदरात.

डौक्टरानी  कौशल्य  लावून  पणास
सुरक्षित  प्रसूती  केली महिलेची
आनंदास  नव्हता  पारावर , ऐकता
दहाही  बाळांच्या आवाज  रडण्याचा .

प्रसुतीचे  महा  कठीण  कर्म  हे
डौक्टर  हे देवच  जणू
सुरक्षित  अचूक  शस्त्र -क्रिया  करून,
बाळांसह  आईलाही  वाचवायचे  असते .

त्या मातेचा  अवर्णनीय  आनंद
आज गगनातही  नाहीय मावत
मुला  - बाळांनी  भरलेले  घर  तिला
आताही  डोळ्यांपुढे  आहे  दिसत .

त्यांचे  गोकुळ  आज भरलंय
बोबड्या  बोलांनी  ते  फुललंय
आईपण   देऊन आपल्या  मातेस ,
बाळांनी  तिला  कृतार्थ  केलंय .

दहा  बाळांची  पालन  जबाबदारी   
निश्चितच  कस  लागेल पालकांचा
पण तेही  ते  आनंदाने सहतील  ,
घेऊन  प्रण  बाळांना  वाढविण्याचा .

-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-12.06.2021-शनिवार.