पाऊस कविता - "आज , डोळ्यांचे पारणे फिटले "

Started by Atul Kaviraje, June 12, 2021, 02:55:13 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो ,

     शेवटी  पाऊस  मनापासून आला आहे, भरपूर  पडतो आहे, जोरदार  पडतो  आहे, सारी  कसर  भरून  काढतो  आहे , मला, आपल्या सर्वांना, सर्व  चराचराला  आनंद  झालेला  आहे सर्वात  जास्त  आनंद  झाला  आहे त्याला  म्हणजे  आपला  बळीराजा , शेतकरी  दादाला. त्या खुशीतच  तो  पावसाचे  आभार  मानत  आहे, व त्याचे गुण -गान  गात आहे, त्याच्याच  शब्दात  मी  खालील  कविता रचली आहे, ऐकुया  तर कविता . माझ्या कवितेचे शीर्षक आहे - "आज , डोळ्यांचे  पारणे  फिटले "

                          पाऊस कविता
                  "आज , डोळ्यांचे  पारणे  फिटले "
                  -----------------------------

पर्जन्यराजा ,तुझे  दर्शन  झाले
माझ्या देवाने  दर्शन  दिले
माझी हाक  ऐकून  धावलास,
आज, डोळ्यांचे  पारणे  फिटले.

शिवार  फुलले , वाऱ्यासंगे  डोलले
कणसा - कणसांमध्ये  दाणे  हे तोलले
पाखरांसंगे बोलू  हे लागले,
आज माझे  शेत पहा पिकले.

माझ्या  विहिरीला  पाणी  हो  चढले
तुडुंब  भरून वाहूही  लागले
सोबत ओढेही खळाळून  वहात,
गाणे  तुझे  गाऊ  लागले.

धान्य  वाढले ,अन्नही  मिळाले
आज  उपाशी  झोपावे नाही लागले
सारी  ही  तुझीच  कृपा  पावसा,
तुझ्यामुळेच हे नवं - जीवन  मिळाले.

असाच  तू  येत रहा
असाच  तू  पडत  रहा
डोळ्यांत  प्राण आणून वाट पाहीन,
जन्मोजन्मी तुझा उतराई होईन.

-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-12.06.2021-शनिवार.