जीवनावर आधारित कविता - " हीच तर जगण्याची जिद्द "

Started by Atul Kaviraje, June 12, 2021, 11:04:04 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     त्या  दिवशी  मी  रस्त्यावरून  चाललो  होतो.अचानक  माझी  नजर  रस्त्याच्या   कडेस  पडली. रस्त्याच्या  त्या  सिमेंटच्या  दोन  कपारीं -मधून  एक  इवलेसे  रोप  मजकडे  पाहून  हसत  डोलत  होते. जणू  मला  सांगत  होते, पहा  माझी  जगण्याची  जिद्द, आणि  तू  लहानश्या  अपयशाने  खचून  जातोस, कोलमडून  जातोस.  थोडे  तरी  माझ्या  सारखा  होण्याचा  प्रयत्न  कर. अशीच  जगण्याची  जिद्द  ठेव. त्या  पाषाणातून  डोकावणाऱ्या  इवल्याशा  जीवाला  मी  मनोमन  वंदन  केले. या  बिकट ,कठीण   
परिस्थितीतही. त्या  रोपाने  जगण्याची , फुलण्याची  जी  जिद्द  दाखवली  त्यास  मनोमन  सलाम  केला.  यातूनच  मला  एक  सुंदर  काव्य  स्फुरले.  ऐकुया  तर  उत्स्फूर्ततेने  जीवन  जगण्यावरची ही लहानशी  जिवंत  कविता. कवितेचे  शीर्षक आहे - " हीच  तर  जगण्याची  जिद्द   "

                         जीवनावर आधारित कविता
                       " हीच  तर  जगण्याची  जिद्द "
                       --------------------------

पहाटेस फिरता फिरता
अवचित नजर पडली
सलाम तुला हे फुला,
तुझी जगण्याची जिद्द मी पहिली.

नाही स्थल नाही जल
सारीकडे पाषाण अन धूल
परी फुलणारे तुझे जीवन,
मला काहीतरी सांगून गेले.

उद्याची काय बात करावी
आजचे जीवन जगून घ्यावे
पण तुझे हे जगण्याचे गाणे,
मला जीवन तराणे शिकवून गेले.

     मित्रानो, पुन्हा एकवार या फुलास माझा सलाम, त्याने जगण्याची, फुलण्याची जिद्द दाखवली, या कठीण अन बिकट परिस्थितीतही.

-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-12.06.2021-शनिवार.