प्रेम-कविता - "प्रेम -बाग अशीच बहरू दे "

Started by Atul Kaviraje, June 16, 2021, 11:52:16 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

      हे जग फार सुंदर आहे, फक्त आपली त्याकडे पाहण्याची दृष्टी ही निर्मळ हवी, आणि त्यात भरीस भर म्हणजे प्रेमी-प्रेमिकाचे अनोखे प्रेम-मय जग. होय, मित्रानो, त्यांचे जगच वेगळे असते, तिथे घृणा, असूया, तिरस्कार या नकोश्या  असणाऱ्या भावनांना जागा नसते, असतो फक्त आपलेपणा, प्रेम, ओढ, माया आणि बरंच काही.

      प्रस्तुत कवितेतील नायिका म्हणजे प्रेमिका, आपलं प्रेम म्हणजे बहरलेली बाग समजतेय, एका प्रेम रोपट्याचं, मोठ्या वृक्षात रूपांतर झालेलं ती पाहत आहे. ती सजणाला सांगत आहे, हे प्रेम-अंकुर जपून, आपलं प्रीती-रोपटं वाढवून, एक प्रेम-फुलांनी बहरलेली बाग मला पाहायची आहे. आणि नंतर मला या प्रेम-विश्वात रमून जायचं आहे.

     अनेक प्रेम-विशेषणांनी, युक्त अशी ही माझी प्रस्तुत प्रेम - कविता, तिच्याच तोंडी आपण ऐकुया. कवितेचे शीर्षक आहे - "प्रेम -बाग  अशीच  बहरू दे "

                            "प्रेम -बाग अशीच बहरू दे "
                            -------------------------

ही बाग फुलांनी बहरलेली
हे प्रेम त्याहूनही बहरलेल
आणी काय हव रुजुवात होण्यास,
हे प्रेम रोपट असंच फोफावलेल.


तुझ्या मनातला हळुवार भाव
मी येथेच तर जाणलेला
तुझ्या नजरेतील प्रेम भाव,
मी येथेच तर पाहिलेला.


प्रेमाला फुटतोय आपल्या अंकुर
येथेच मला आली प्रचीती
आता माझे हेच प्रेम-विश्व,
अशीच फुलू दे अपुली प्रीती.


-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-16.06.2021-बुधवार.