!! ओम साई !! ( भक्ती काव्य ) - " दर्शनाने तुझ्या धन्य मी जाहलो "

Started by Atul Kaviraje, June 17, 2021, 10:52:48 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

    आज गुरुवार आहे, म्हणजे गुरूंचा वार. आज मी तुम्हाला ओम श्री साईंवर रचित एक भक्ती-काव्य ऐकवीत आहे. आपणांपैकी बरेच जण साई भक्त असतीलच.  श्रद्धा-सबुरी मंत्राचा जागर असलेली, पुण्यधाम, शिरडी - धाम येथे श्री साईंचे वास्तव्य कित्येक कालापासून आहे. अत्यंत प्रसन्न, सुहास्य-वदन, संगम-रवरी एकाच दगडातून नितळ,स्फटिकासम कोरलेली अशी ही साईंची मूर्ती पहाताच, मन कसे उल्हासित होते, मनाची मरगळ क्षणात दूर होते, मन साई चरणी झुकते.

     तर असे हे साई-बाबांचे शिरडी ठिकाण.  येथील दर्शनाचा मला काय अनुभव आला, हे मी माझ्या प्रस्तुत कवितेत वर्णिले आहे. आपण सर्वां देखील एक आगळीच अनुभूती, श्री साई दर्शनाने येईल, यात शंकाच नाही. ऐकुया तर, ओम साईंचे भक्ती काव्य - " दर्शनाने तुझ्या धन्य मी जाहलो "


                         !! ओम साई !!  ( भक्ती काव्य )
                         " दर्शनाने तुझ्या धन्य मी जाहलो "
                         -----------------------------

सहवेना  तळमळ, व्यथित मनाची
ऐक आता साई, साद  हृदयाची
कळकळीने तुझ्या स्थानाशी मी धावलो,
दर्शनाने तुझ्या धन्य मी जाहलो.

     शिर्डी-धाम पावन, वसलेले या भुवन
     त्यात होते साई तव मूर्तीचे स्तवन
     तुझ्या पावलांच्या ओढीने झडकरी आलो,
     दर्शनाने तुझ्या धन्य मी जाहलो.

मी दर्शनाचा भुकेला, तू धावलास हाकेला
संकटाच्या दरीतून माझा परिहार केला
कृपा-प्रसादाने तुझ्या अंतरी निमालो,
दर्शनाने तुझ्या धन्य मी जाहलो.

     सहस्त्र-नामावली असे माझ्या मुखी
     भव-ताप हरले, झाले जीवन सुखी
     जन्मोजन्मीचा तुझा ऋणी मी राहिलो,
     दर्शनाने तुझ्या धन्य मी जाहलो.

-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-17.06.2021-गुरुवार.