पाऊस कविता - "पाऊस आज थांबतच नाही"

Started by Atul Kaviraje, June 17, 2021, 11:32:12 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

 मित्र/मैत्रिणींनो.

      आज म्हणजे गुरुवार, मुंबईमध्ये सायंकाळीच पावसाने धुमशान घातले आहे. थैमान घातले आहे.सतत, न थांबता, तो संततधार असा कोसळतच आहे. एरव्ही तो पडतच असतो. पण आजची गोष्ट वेगळी आहे. आज तो मनस्वी झालायं. गेले कित्येक तास मी त्याचा तो मोहित करणारा आवाज ऐकत आहे.अध्ये - मध्ये त्यास वाराही खेळवीत आहे.

      खरोखरच त्याची ती ताकद, उत्साह, जोम मी आजवर निसर्गात कुठेही पाहिला नाही. निसर्गाचा हा आणि एक चमत्कार मी याची देही, याची डोळा माझ्या समोर पाहात आहे. हि कविता लिहिताना तो आताही आपले रूप दाखवीत आहे. आणि मी घरी बसून माझ्या गणकयंत्रावर हि उत्स्फूर्त  कविता टाईप करीत आहे.

      असो, अजून काही बोलणे नाही, हा पाऊस मला नेहमीच मोहित, संमोहित करीत असतो. त्याच्यापुढे मी काहीच बोलू शकत नाही, अगदी निरुत्तर करून टाकतो तो मला. ऐकुया तर पावसावरली अजून एक नुकतीच सुचलेली सोप्या शब्दांतील  कविता - कवितेचे शीर्षक आहे- "पाऊस आज थांबतच नाही"

                           पाऊस कविता
                    "पाऊस आज थांबतच नाही"
                    ------------------------

आज काय पावसाला झालयं
आज असं काय घडलंय
मनस्वी झालाय तो आज,
पाऊस आज थांबतंच नाही.

रूप त्याचे पहातोय प्रथमच
स्वरूप त्याचे भासतेय रौद्रच
न राहून शंका येत राही,
पाऊस आज थांबतंच नाही.

आज सायंकाळचा गार वारा
साथीस त्याच्या टपोऱ्या गारा
सृष्टिसवे  बळेच खेळत राही,
पाऊस आज थांबतच नाही.

सतत, संततधार, जल धर्तीवर
बरसून मनच भरत नाही
कळिकाळाचे त्यास भानच  नाही,
पाऊस आज थांबतच नाही.

आजवर असा पाहिला नाही
पाणी, पाणी आणि पाणीच होई
अणिकच धरतीस भिजवीत राही,
पाऊस आज थांबतच नाही.

आपल्या हाती नाही काही
मनुष्य हताश पहात राही
व्यवहार सारे करून ठप्प,
पाऊस आज थांबतच नाही.

पडूनच घ्यायचंय त्याला आज
गम्मतच पाहायचीय त्याला आज
निसर्गाची हलकीशी दाखवीत चुणूक,
पाऊस आज थांबतच नाही.

बा पावसा ये तू
बा पावसा पड तू
तुजला थांबवायचे धाडस कोणाचे ?
तुझे नेहमीच स्वागत होई.


-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-17.06.2021-गुरुवार.