बाप

Started by Dnyaneshwar Musale, June 20, 2021, 08:46:50 PM

Previous topic - Next topic

Dnyaneshwar Musale

बाप मायेचा झरा
बाप घामाच्या धारा
बाप भरलेला वाडा
बाप प्रेमाचा सडा.

बाप उन्हाचा पहार
बाप आयुष्याचा सार
बाप घराचा थाट
बाप लेकराची पहाट.

बाप पिंपळाच झाड
बाप सावली गाढ
बाप लेकराची तहान
बाप लेकरासाठी लहान
बाप असे माझा महान

बाप आळंदी पंढरपुर
बाप देऊळ राऊळ
बाप अभंगाची वाणी
बाप आभाळावानी.