चारोळी-लेख - "एक्स्पोझ"

Started by Atul Kaviraje, June 21, 2021, 01:50:32 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 चारोळी-लेख
                                  "एक्स्पोझ"
                                 -----------
                                   
================
एक्स्पोझ
================


ताज्या दमाच्या सड-पातळ हिमेशने
सीने सृष्टीला दिलीय नवीन पोझ
जुन्या जमान्यात परत जाऊन,
सिनेमा काढतोय पहा " एक्स्पोझ "

======================

     मित्रानो, या हिमेशला झालंय तरी काय ? गाण्याचे जग सोडून सिनेमाच्या जगात काय वावरतोय ? गाणी गाऊन गाऊन कंटाळा आलाय वाटत ! आणी घुसलाय सिनेमाच्या झग-मगा-टी क्षेत्रात. कि जिथे जास्त प्रसिद्धी मिळते, पण मला वाटत त्याचा हा होरा साफ चुकला असावा, या हि पूर्वी त्याने बऱ्याच  सिनेमात काम केले आहे, परंतु या सिनेमात पदार्पण करण्यापूर्वी त्याने स्वतःला इतके रोडावले आहे, सड पातळ केले आहे, कि तो पोलीस वाटतच नाही, आणी सिनेमा काढलाय तोही जुन्या जमान्यातला, बाकी सिनेमाची कथा, पट-कथा तीच, पुन्हा पुन्हा उगाळलेली .


     बाकी त्याची हि नवीन पोझ मला आवडली, आणी त्याचा एक्स्पोझ हि जेमतेमच आवडला . माझे प्रामाणिक मत आहे कि त्याने आपले गाण्याचे क्षेत्र बऱ्यापैकी  सांभाळावे, या सिनेमाच्या नादी लागू नये. बाकी सिनेमा मधली गाणी उत्तम, इतर गायक-गायीकानाही त्याने वाव दिलाय पण तो हि यथा तथाच  वाटतो.

     हिमेश दा, तुझ्या पुढच्या गाण्याच्या अलबम ला माझ्या अनेक शुभेच्छा .


-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-21.06.2021-सोमवार.