प्रेरणादायी कविता - "नेत्रहीन ते खरे, परि लंघून जाती गिरी-शिखरे"

Started by Atul Kaviraje, June 24, 2021, 11:38:57 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     काही दिवसांपूर्वी एक बातमी टी व्ही द्वारे पाहण्यात आली होती, कि अंध व्यक्तींनी गिरी-शिखरे     पादाक्रान्त केली होती. डोळ्यांना दिसत नसूनही, कुणा सहकारी गिर्या-रोहकांच्या आधारे केवळ जिद्दीच्या बळावर, नि भिता, निडरपणे, पर्वत-रांगांमध्ये गिरी-भ्रमण केले होते. त्यांची हि जिद्द खरोखर वाखाणण्याजोगी होती. धड-धाकट माणसाला, काहीही व्यंग्य नसलेल्या मनुष्याला जे जमणार नाही, ते त्यांनी, आपल्या इच्छा-शक्तीवर करून दाखविले होते.

     खरोखर, आपण या अंध व्यक्तींकडून काहीतरी शिकावयास हवे. अंधत्त्वाचा हा श्राप न बाळगता, त्यावर मात करून, अविश्वसनीय असे काम आपण ही करू शकतो , हे त्यांनी अखिल जगतास दाखवून दिले आहे. त्यांना माझा मनापासून सलाम. आज ते अपंग नाहीत. आज ते सर्व-सामान्य मनुष्याचे जीवन जगत आहेत. त्यांच्या या प्रेरणादायक, स्फूर्तिदायक अश्या या अनोख्या कामगिरीवर  एक कविता प्रस्तुत करतो. कवितेचे शीर्षक आहे - "नेत्रहीन ते खरे,परि लंघून जाती गिरी-शिखरे"

                           प्रेरणादायी कविता
              "नेत्रहीन ते खरे, परि लंघून जाती गिरी-शिखरे"
              ---------------------------------------

अंधत्त्व आहे एक श्राप
नियतीपुढे कुणाचे काय चालते ?
नशीबच घेऊन येतो जन्मा,
अपंगत्त्व कोसतंय पुऱ्या जन्मा.

पोटी आईच्या नवमासी गर्भ
त्यास नाही माहीत आपले प्राक्तन
कमीपणा घेऊन जन्मा येणे,
जन्मभराचे असते मूक आक्रंदन.

समाजाचे चुचकारे, जनांचे अरेरे
ऐकतच दिवस कंठायचे अंधानी
आधारासी घेऊनि हात दुजा, करिती,
असहाय्य आक्रोश, मूक हुंदक्यांनी. 

पण आता नाही ती भावना
कमीपणाची ,स्वतःचीच अंतस्थ वेदना
चक्षूहीन तरी, मनाच्या डोळ्यांनी,
पाहती जगास, हुंदका आवरुनी.

आज नाहीत ते लाचार
नकोय त्यांना आता आधार
डोळस अंतःकरणाच्या पारदर्शक पटलातून,
त्यांनी मिळवलाय खरा स्वाधार. 

त्यांचे अपंगत्त्वच आहे त्यांचे असामान्यत्त्व
लाचार नाहीत, नाही उरी बोचरी खंत
इतरेजनांचे सामान्य जीवन सहज,
अशक्यप्राय, तरी ते आहेत जगत.

मनाचा करुनि एक कठोर निर्धार
नाहीत ते आता दुबळे, निराधार
स्थान स्वतःचे, जग आपल्यांचे,
निर्माण करून घेतलाय भरार .

स्व-बळाने परिपूर्ण, ताकद लावून पणा
अन दाखवून सच्चा स्वाभिमानी बाणा
जोरावर हिमतीच्या कणखर कण्याने,
काबीज केलाय त्यांनी सह्याद्रीचा कडा.

जन्मभराचे जरी बाळगलंय अपंगत्त्व
आयुष्यभरास आलंय नशिबी अंधत्त्व
लाजविणारे डोळसांस, कृत्य हे डोळस-पणाचे,
जाती लंघूनि पर्वते, हेच त्यांचे सत्त्व.

एका महत्त्वाकांक्षी, निग्रही बाण्याने
समाजास जाणीव करून दिलीय
आज पर्वतानाही झुकवून त्यांनी,
अंधत्त्वावर खरीखुरी मात केलीय.


-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-24.06.2021-गुरुवार.