एका चुकीची किती हि शिक्षा

Started by sunitsonnet, June 25, 2021, 02:46:08 PM

Previous topic - Next topic

sunitsonnet


एका चुकीची किती हि शिक्षा
ते रूप पाहण्या देवाकडे भिक्षा

कितीही तिरस्कार माझा झाला
तुझी वाट पाहणे नित्य क्रम झाला

तुझी छबी पाहण्या जीव व्याकुळ
कधी तरी दिसशील तू मणी तळमळ

आठवीत ते सुंदर रूप तुझे
घालवितो दुःखद क्षण माझे

जितका तुझपासून दूर मी गेलो
तितक्या आठवणीत नाहून गेलो

आता आठवण तुझी
जीवनाची सखी सोबती माझी

-स्वरचित
सुनीत Sonnet

Atul Kaviraje

सुनीत (Sonnet) सर,

     गत आयुष्यात घडलेल्या चुकांचे परिमार्जन आताच्या जीवनात करणे, यापेक्षा मनाचा मोठेपणा तो काय ! या कवितेतील नायकाच्या हातून गत-काळात ज्या कळत नकळत चुका घडलेल्या होत्या, त्यांची त्याला आता शिक्षा भोगावी लागत आहे, हे आपली विरह - कविता - "एका चुकीची किती हि शिक्षा", या लघु-कवितेतून सुंदर रित्या वर्णन केले आहे. सोप्या शब्दांत, आपल्याकडून घडलेल्या चुका आणि त्या उरलेल्या आठवणी, आपण या कवितेतून नमूद केल्या आहेत.

     या चुकीची त्याला इतकी दुःखदायक, वेदनादायक शिक्षा भोगावयास मिळेल, याचीच त्याला आता खंत आहे. असं घडायला नको होत, पण आता ती वेळ निघून गेली आहे, आणि फक्त आठवणीच त्या उरल्या आहेत.

     कळत नकळत घडतात चुका
     TO ERR IS HUMAN
     पण नसावा त्याचाच विचार फुका,
     TO FORGIVE IS DIVINE

     सर्व चरणी अर्पावे देवाच्या
     निखळ मनाने, उदार अंतःकरणाने
     परिमार्जन चुकांचे करावे जरूर,
     पुनरावृत्ती न व्हावी चुकांची नव्याने.

     चुकांची शिक्षा मिळत जाते
     हि नियतीचीच खेळी असते
     पण त्याच त्या आठवणींत न रमता,
     पच्छाताप सोडून,धरावा पुढती रस्ता.


-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-28.06.2021-सोमवार.