वनवास

Started by sunitsonnet, June 25, 2021, 03:14:42 PM

Previous topic - Next topic

sunitsonnet


सीता राम यांनाही वनवास झाला
त्यांचा वनवास इतरांमुळे
तुझा माझा हि वनवास झाला
तो केवळ माझ्यामुळे

सीता राम यांनी वनवास
सह अस्तित्वास घालवला
तुझा माझा वनवास 
विरहात घालवला

तुझ्या पर्यंत पोहोचण्याचा
प्रयत्न अनंत केला
सीता राम लढाया जिंकत गेले
माझी लढाई मीच हारत गेलो

प्रशस्त मार्ग तुझ्याकडे येण्याचा
मीच मीच बंद केला
आज पाऊलवाटा हि बंद आहेत
कुंपणा पलीकडे पाहताना मी रक्तबंबाळ

या जखमा पाहून दुखी न होता
त्यांना कवटाळतोय जीवनभर
सीता राम वर्ष चौदा वनवासात
आपण मात्र वर्ष अट्ठावीस

माझ दुःख कुर्वाळन विसरून
इतरांच्या जीवनात सुख देण्यात प्रयत्नरत
मात्र एकांतात काहूर तुझ्याच आठवणींचा
रक्तबंबाळ मनाला तूझ हळूच ते गोंजारन

भानावर येतो तेव्हा तू कोठेच नसतेस
असतात त्या केवळ आठवणी
शिदोरी आठवणींची हरणार होती
तू कसली हरू देनार पुन्हा जिवंत केली

कोविडरूपी यमदूता कडून हिरावून
प्राण ज्योत माझी पुन्हा तेवत ठेवलीस
माझ्या कुंद मनाला पुन्हा
मनातुन हळुवार साद दिलीस

तुझ्या सहवासात जेवढं प्रेम मी केलं
त्याच्या कैक पटीनं अधिक या विरहात केलं
तुझं माझ्यावरील प्रेम कमी झालही असेल
मी मात्र ते जपण्यात माझं आयुष्य वेचलं

ज्या टिळक चौकात त्यागलं तुला
एक झलक पाहण्या तुझी
आसुसलेलं मन माझं
तो चौक आज माझी अयोध्या

-स्वरचित-
सुनीत Sonnet

Atul Kaviraje

सुनीत (Sonnet) सर,

     "वनवास", या विरह कवितेतून आपण, श्रीराम प्रभू आणि पूजनीय सीता माई, यांच्या त्यागाची कहाणी प्रस्तुत केली आहे. या त्यागातूनच त्यांना देवपण प्राप्त झाले. त्यांच्या जीवनाशी तुम्ही आपल्या जीवनाची सांगड घालण्याचा स्तुत्य प्रयत्न केला आहे. त्यांच्या नशिबी आलेला वनवास, त्यांनी केलेले युद्ध, त्यात मिळालेला विजय , या साऱ्या गोष्टी थोड्या-फार फरकाने  का होईना, आपलाही आयुष्यात आल्यात.

     विरहाची सल, ही आपल्या प्रत्येक कडव्यातून, डोकावत आहे. दुःखाची झळ, ही आपल्या प्रत्येक ओळीगणिक स्पष्ट जाणवत आहे. पण या सर्व दुःखातून तुमचे प्रेम किंचितही कमी झालेले नाही. आता उरल्यात फक्त आठवणीच, त्या आठवणींतच तुम्ही तुमचे हे विरह - जीवन जगत आहात. कवितेची संकल्पना सुंदर आहे.

     काहींच्या नशिबी असतो सहवास
     काहींच्या भाळी असतो वनवास
     या नियतीच्या अटळ खेळामध्ये,   
     जीवन जगणे असते एक आभास.

     रामासही चुकला नाही वनवास
     प्रारब्ध त्यांनाही स्वीकारावे लागले
     प्रत्येकाच्या जीवनाची वेगळी कहाणी,
     कधी सुख, तर कधी दुःख विराणी.

     हा विरह देतो आपणास शक्ती
     दुःख,सल सहन करण्यास
     सारे सारे विसरून, फिरून पुन्हा
     जोमाने एकदा भरारी घेण्यास.


-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-28.06.2021-सोमवार.